शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

रक्ताचे डाग, फाटलेले कपडे; पालघरमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 15:27 IST

Palghar News : गणपती आगमन मिरवणूक बघायला गेलेल्या दहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्या सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना ...

Palghar News : गणपती आगमन मिरवणूक बघायला गेलेल्या दहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्या सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे. ३० वर्षाच्या दोन नराधमांनी मुलीला अडवले आणि निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या. 

अंगावरील फाटलेले कपडे बघून आई वडिलांनी या चिमुकलीची चौकशी केली. त्यावेळी झालेला सगळा प्रकार सांगितला.

पोलिसांनी केलेल्या तपासात अशी माहिती समोर आली की, 2 सप्टेंबर रोजी १० वर्षीय पीडिता गणपती आगमन मिरवणूक बघण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मिरवणूक बघून घरी परतत असताना दोघांनी तिला आडवले. या दोघांनाही ती ओळखत होती. कारण, पीडिता राहत असलेल्या परिसरातच दोन्ही आरोपी राहतात. 

निर्जनस्थळी नेऊन केले अत्याचार

दोन्ही आरोपींनी तिला बोलण्यात गुंतवले आणि नंतर जबरदस्तीने निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेले. तिथे आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. आरोपींनी नंतर तिला सोडून दिले. दरम्यान, मुलगी परत न आल्याने तिचे आईवडील शोधत होते. रात्री १०-१०.३० वाजेच्या दरम्यान ती घरी आली. तेव्हा तिच्या अंगावरील कपडे फाटलेले होते.

आईवडिलांनी तिला कपडे फाटण्याचे कारण विचारले, तेव्हा तिने झालेल्या प्रकाराबद्दल सांगितले. आईने तिला नीट बघितले तेव्हा तिच्या प्रायव्हेट पार्टवर रक्ताचे डाग होते. पीडित मुलीने अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आईवडिलांनी सांगितली. 

आईवडिलांनी पीडितेसह पोलीस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेतला आणि अटक केली. न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. 

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPOCSO Actपॉक्सो कायदा