साकोली (भंडारा) : साकोली तालुक्यातील सुंदरी येथील शेतशिवारात एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याघटनेने गाव परिसरात एकच खळबळ उडाली. काेमल वाघ रा. परसोडी व कमलेश राऊत रा. सुंदरी असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे. ही घटना शनिवार सकाळी उघडकीस आली.शनिवारी सकाळी सुंदरी येथील शेतशिवारात एकाच झाडाला युवक व युवती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. साकोली पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या चौकशीनंतर दिघेही नम्रता ज्युनिअर कॉलेज साकोली येथील बारावीचे विद्यार्थी असल्याचे पुढे आले. मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट असून प्रेम प्रकरणातून त्यांनी हे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.
खळबळजनक! पती-पत्नीचे कार्यालयात मृतदेह, घरात दोन मुलींचाही आत्महत्येचा प्रयत्न
वृद्ध आईचे हात बांधून बंधक बनविले; सैन्यदलाच्या अधिकाऱ्याच्या घरी दरोडा