शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

खळबळजनक! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले संशयास्पद अवस्थेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 7:09 PM

मुलांसह तिघांची हत्या करून आत्महत्या केल्याचा संशय

ठळक मुद्देधीरज राणे (४१), डॉ. सुषमा धीरज राणे (३९), ध्रव धीरज राणे (११) ववन्या धीरज राणे (५) अशी मृतांची नावे असून ते संत जगनाडे सोयायटी, ओमनगर, कोराडी नाका येथे राहत होते.माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. धीरज, धुव्र व वन्या यांचे मृतदेह एका खोलीत झोपलेल्या अवस्थेत आढळून आले.

नागपूर / कोराडी : प्राध्यापक पती आणि डॉक्टर पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळले. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत  मंगळवारी (दि. १८) दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. धीरज राणे (४१), डॉ. सुषमा धीरज राणे (३९), ध्रव धीरज राणे (११) ववन्या धीरज राणे (५) अशी मृतांची नावे असून ते संत जगनाडे सोयायटी, ओमनगर, कोराडी नाका येथे राहत होते.

धीरज राणे वानाडोंगरी (ता. हिंगणा) येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख तर डॉ. सुषमा या धंतोली, नागपूर येथील अवंती हॉस्पिटलमध्ये नोकरी करायच्या. घरी धीरज यांची आत्या प्रमिला (६५) असून, तिने सकाळी बराच वेळ होऊनही भाचा, सून नातवांपैकी कुणीच बाहेर दिसत नसल्याने धीरज यांच्या खोलीचे दार ठोठावले. आवाजही दिले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.  त्यामुळे  धीरजच्या आईने शेजारच्या किराणा दुकानदारास तसेच  ओमनगरात राहणारे सुषमा यांचे बंधू रितेश सिंग यांना माहिती दिली. नंतर पोलिसांना कळविले.

माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. धीरज, धुव्र व वन्या यांचे मृतदेह एका खोलीत झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. त्या खोलीत इंजेक्शनच्या दोन रिकाम्या सिरिंज आढळून आल्या. पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या. डॉ. सुषमा यांचा मृतदेह घरातील दुसऱ्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सुषमा यांच्यासोबत आपले सोमवारी (दि. १७) रात्री १२ वाजताच्या सुमारास बोलणे झाले होते, अशी माहिती धीरजच्या आईने दिली. राणी दाम्पत्य पैकी एकाने मुलांचे तिघांची हत्या करून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक संशय आहे.या घटनेची वार्ता वायुवेगाने कोराडी आणि आजूबाजूच्या गावात पोहोचली. त्यामुळे मोठ्या संख्येत बघ्यांनी राणे दांपत्याच्या निवासस्थानासमोर गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम बोलवून घेतली. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही भेटी देऊन घटनेमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वृत्त लिहिस्तोवर यासंबंधाने पोलिसांकडून अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. ऐन पोळ्याच्या दिवशी अत्यंत सुखवस्तू कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे पंचक्रोशीत उलट सुलट चर्चा केली जात आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

 

बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी

 

पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी

 

पत्नीचे सहा तुकडे करून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता पती पण...

 

बाथरुमधील खिडकीच्या काचेनं गळा, हाताची नस कापून घेतली; खुनाच्या आरोपीचा जेलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न

 

19 मांजरींचा संशयास्पद मृत्यू, विष देऊन मारल्याची शक्यता

 

टॅग्स :Suicideआत्महत्याDeathमृत्यूMurderखूनPoliceपोलिसnagpurनागपूर