माजी रणजी क्रिकेटपटू जयमोहन थंपी (६४) यांचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी हत्येच्या आरोपीखाली केरळपोलिसांनी थंपी यांच्या मुलाला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार थंपी यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या डोक्याच्या मागील भागास दुखापत झाल्याचे समोर आलं. त्यानंतर, थंपी यांचा मुलगा अश्विनने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झालं
शनिवारी जेव्हा हे हत्याकांड घडले तेव्हा अश्विन मद्यधुंद अवस्थेत होता. मद्यधुंद असताना अश्विनने वडिलांची हत्या केली. याबाबत पोलिसांनी अश्विनकडे चौकशी केली असता त्याने मला फक्त मी मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आठवतंय, बाकी काही आठवत नाही असे सांगितले. या हत्याकांडात अजून कोणाचा सहभाग आहे का? याबाबत अश्विनकडे चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. अश्विनला कोर्टात हजर केले जाईल.
दारू पिऊन आल्यानंतर अश्विन आणि वडील थंपी यांच्यात वादविवाद झाला होता. पोलिसांना संशय आहे की, थंपी यांना मुलाने ढकल्याने गंभीर जखमी झाले असावेत. घरकाम करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, या वडील आणि मुलात वारंवार भांडणं होत असत. केरळ पोलिसांनी मंगळवारी थंपी यांच्या मृत्यूप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. थंपी यांचा मृत्यू ढकल्याने पडून झाला की अन्य कोणत्या कारणामुळे झाला याबाबत पोलीस तपास करत आहेत. थंपी यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचा मुलगा अश्विन घरीच होता. वडील झोपले होते. त्यानंतर मी घरातून निघालो असे अश्विनने पोलिसांना सांगितले. तळमजल्यावरून दुर्गंधी येत असल्याबाबत तक्रार शेजाऱ्यांनी दिल्यानंतर पोलिसांना राहत्या घरात थंपी यांचा मृतदेह आढळला. थंपी हे बँकेतून निवृत्त झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.
असला कसला अंधविश्वास, कोरोनाला पळवण्यासाठी दिला चक्क ४०० बकऱ्यांचा बळी
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर अपशब्द, पोलीस ठाण्यात तक्रार
अस्तनितले साप! भारतीय सैन्यात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी, दोघांना अटक
अर्णब गोस्वामी एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर
खळबळजनक! मुलीचे अपहरण करून महसूल कर्मचाऱ्यासह दोघांनी चालत्या कारमध्ये केला बलात्कार
‘तू मुझे जानता नही, मै...असं म्हणत पोलिसाला मारहाण करून केले गंभीर जखमी