रक्ताच्या थारोळ्यात घरात सापडले मायलेकाचा मृतदेह, महाराष्ट्रातील कुटुंब गेलं होतं इंदूरला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 09:42 PM2022-01-13T21:42:08+5:302022-01-13T21:45:43+5:30
Double Murder Case : तिघेही महाराष्ट्रातील अकोल्यातील रहिवासी असून, ते कामाच्या शोधात येथे ओळखीच्या व्यक्तीच्या घरी थांबले होते.
इंदूर : मिनी मुंबई म्हटल्या जाणाऱ्या इंदूरच्या बाणगंगा पोलिस स्टेशन परिसरात दुहेरी हत्याकांडाचे थरारक प्रकरण समोर आले आहे. येथे निर्दयी पतीने पत्नी आणि मुलाची हत्या करून पळ काढला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे. ही घटना गणेश धाम कॉलनीची आहे.
खरंतर ही संपूर्ण घटना इंदूरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरातील गणेश धाम कॉलनीची आहे. महाराष्ट्रातील अकोला येथे राहणारे कुटुंब कामाच्या शोधात इंदूरला आले. पती कुलदीपने 11 वर्षाच्या मुलाचा गळा चिरून आधी धारदार शस्त्राने खून केला, त्यानंतर पत्नी शारदाबाईची हत्या करून तो पळून गेला.
घरमालकाने माहिती दिली
घरमालकाच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले असता खोलीत दोघांचेही मृतदेह पडलेले दिसले. एफएसएलची टीमही घटनास्थळी पोहोचली आणि तपासाअंती दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या पती कुलदीपने केली आहे. सध्या आरोपी पती फरार आहे. पोलीस ज्याचा शोध घेत आहेत, त्याच्या अटकेनंतर हत्येमागचे कारण समोर येईल.
कामाच्या शोधात आले
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश (मुलगा) चार दिवसांपूर्वी वडील कुलदीप डेंगे आणि आई शारदाबाई यांच्यासोबत इंदूरला आला होता. तिघेही महाराष्ट्रातील अकोल्यातील रहिवासी असून, ते कामाच्या शोधात येथे ओळखीच्या व्यक्तीच्या घरी थांबले होते.