दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी भटवाडी येथे कॉजवेच्या खाली चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचा गळा आवळून खून करून नंतर तिचा मृतदेह आणून टाकला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंखे घटनास्थळी दाखल झाल्या आहे.
मृतदेह हा सोमवारी पहाटे आणून टाकला असावा असाही कयास वर्तविला जात आहे.दरम्यान श्वानपथक व ठसेतज्ञा नाही पाचारण करण्यात आले आहे. चेहरा विद्रुप करण्यात आल्याने सदरच्या महिलेची ओळख पटविणे तुर्तास कठीण असून पोलिसांसमोर खुन्याला गजाआड करण्याचे कठीण आव्हान उभे ठाकले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी , घोटगेवाडी येथील पुरोहित मणेरीकर हे सोमवारी संध्याकाळी गुरांना घेऊन नदीकाठावर पाणी पाजण्यासाठी आले असता त्यांना एका महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. लागलीच पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी , सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर फौंजफाट्यासहित घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून तिच्या अंगावर लाल रंगाचा कुर्ता परिधान केल्याचे आढळून आले. तिच्या हातात एक सोन्याची बांगडी तर हाताच्या बोटात एक अंगठी आढळून आली.शिवाय चपलाही आढळून आल्या. सदरच्या महिलेचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला असल्याने ओळख पटली नाही .दरम्यान सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.सदरचा मृतदेह हा मारेकऱ्याने गळा आवळून खून केल्यानंतर गाडीतून आणून टाकला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.
मृतदेह ओढत नेऊन टाकल्याच्या घटनास्थळी खुणाखून केल्यानन्तर मृतदेह गाडीतून आणून तो कॉजवेच्या डाव्या बाजूने टाकण्याचा खुन्याने प्रयत्न केला.मात्र महिलेची शरीरयष्टी मोठी असल्याने त्याला मृतदेह उचलून संरक्षक कठड्यावरून खाली टाकणे शक्य झाले नाही परिणामी त्याने तो ओढत नेऊन कॉजवेच्या उजव्या बाजूला नेऊन टाकला. मृतदेह ओढत नेल्याच्या खुणा घटनास्थळवर आढळून आल्या आहेत. चेहरा विद्रुप करण्यासाठी वापरलेला दगड घटनास्थळी खुन्याने महिलेचा चेहरा विद्रुप करण्यासाठी वापरलेला दगडही घटनास्थळीच आढळून आला असून त्याच्यावर रक्ताचे डाग सापडले आहेत.
स्थानिक गुन्हा अणवेशन विभागाचे पथक दाखलखुनाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अणवेशन विभागाचे पथक सोमवारी रात्रौ १२ वा. घोडगेवाडीत दाखल झाले. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग , संदीप भोसले , केसरकर , रवी इंगळे आदीनी घटनास्थळाची पाहणी केली.