कऱ्हाड : वारूंजी, ता. कऱ्हाड येथे विमानतळ परिससरातील एका घरात महिलेसह दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. ते दोघेही मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असून वारूंजी येथे भाड्याने रहायला असल्याचे समजते.
वारूंजी येथील सत्यजीत पतसंस्थेच्या पाठीमागील परिसरात मंगळवारी सकाळी सुशिला सुनील शिंदे (वय ३५) व विराज निवास गायकवाड (२) यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी येत होती. हा प्रकार स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सांगितला.
पोलीस उपअधिक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील घटनास्थळी दाखल झाले. या महिलेचा व बालकाचा खून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली असून वेगाने तपास सुरू करत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.