मुंबई - बोगस कॉल सेंटरचा वापर करत अमेरिकेतील नागरिकांना प्रतिबंधक औषधांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने पर्दाफाश केल्याने एकच खळबळ माजली आहे. यापकरणी पोलिसांनी ८ जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणांत साहीत्य जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. इकरामा नासीर मकादम (वय २६), अरबाज शेख (वय २०), शहारूख अन्सारी (वय २०), जुनेद शेख (वय २२), कदीर सय्यद (वय २०), अतिफ शेख (वय २०), आहाद खान (वय २१), सलमान अब्दुल खान (वय २३) अशी या आरोपींची नावे आहेत. कुर्ला येथून व्हीओआयपी कॉलद्वारे ही टोळी परदेशातील नागरिकांशी संपर्क साधायची. कुर्लाच्या सारा बिजनेस सेंटरमधील स्पीड टेक्नॉलॉजी कार्यालयात अनाधिकृत आणि बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ला मिळणार होती. ही टोळी अमेरिकेतील नागरिकांशी व्हीओआयपी कॉलद्वारे संपर्क किंवा मेसेज करून संपर्क साधायची. गो ऑटो डील या अॅपच्या मदतीने आपण अमेरिकेतूनच बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून व्हायग्रा आणि इतर प्रतिबंधक औषधांची ऑर्डर घ्यायचे. तसेच त्यांच्याकडून डॉलर घेत ते पैसे गेट वेच्या प्रक्रियेने रुपयात करून घेतले जात होते. या काळ्या बाजारातून या टोळीने परदेशी नागरिकांची लाखो डॉलर्सची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने पुर्ण खात्री करुन घेत या कॉल सेंटरवर छापेमारी केली. यादरम्यान, गुन्हे शाखेने आठ जणांना अटक करत होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. तर या गुन्ह्यात इतर आरोपींचाही सहभाग असून पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.
बोगस कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांना विकत होते प्रतिबंधक औषधे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 9:09 PM