मुंबई - एका मॉडेलला काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून तिचे बोल्ड फोटो घेऊन शारीरिक सुखाची मागणी करण्यात आली. ती नाकारल्यावर ते फोटो व्हायरल करण्यात आले. याप्रकरणी मालाड पोलिसानी ओंकार उर्फ ओमप्रकाश राजू तिवारी (२३) नामक फोटोग्राफरला अटक केली आहे. जो स्वत:ची ओळख कास्टिंग डायरेक्टर आणि एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसशी संलग्न फोटोग्राफर म्हणून देतो ज्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट बनवले आहेत.मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवारी हा इंटरनेटवरून टॉप मॉडेल्स आणि अभिनेत्यांचे फोटो चोरायचा आणि त्याने ये फोटो काढल्याचा दावा करत स्वतःच्या सोशल मीडिया पेजवर अपलोड करायचा. अशाच प्रकारे अनेक इच्छुक मॉडेल्स त्याच्याशी संपर्क साधत असत. बंगालच्या २२ वर्षीय मॉडेलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती चित्रपटात करिअर करण्यासाठी मुंबईत आली होती आणि तिवारीच्या प्रोफाइलने प्रभावित झाली व त्याच्याशी ऑनलाइन संपर्क साधला. तेव्हा तिवारीने तिला प्रोडक्शन हाऊसमध्ये काम मिळवून देण्याचे आश्वासन देत तिचे काही बोल्ड फोटो पाठवायला सांगितले.
अंधश्रद्धेतून वडिलांनी घेतला चिमुकल्या मुलाचा जीव, कुऱ्हाडीने केले सात तुकडे
तिने फोटो पाठवल्यावर, तो फोटो व्हायरल करेन असे सांगून तिच्याकडे तो लैंगिक सुखाची मागणी करू लागला. जेव्हा तिने त्याच्या मागणीला नकार दिला तेव्हा त्याने फोटो व्हायरल केले. ही बाब पीडितेला समजली आणि ८ जानेवारी रोजी तक्रार दाखल केल्यानंतर, वरिष्ठ निरीक्षक डी लिगाडे, एपीआय विवेक तांबे आणि त्यांचे सहकारी अशोक कोंडे आणि तौसीफ शेख यांच्या पथकाने रविवारी तिवारीचा टिटवाळा येथील स्वामी समर्थ नगरा येथील घरी शोध घेत त्याचा गाशा गुंडाळला. स्थानिक पातळीवर तो लग्न आणि कार्यक्रमाचे छायाचित्रकार म्हणून ओळखला जातो लिगाडे म्हणाले की त्यांनी तिवारीवर भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे