शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
2
"राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
3
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
4
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
5
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
6
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
7
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
8
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
9
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
10
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
11
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
12
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
13
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
14
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
15
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
16
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
17
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
18
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
19
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर

ना मास्क, ना डिस्टन्सिंग; सचिनची मुलगी सारा तेंडुलकरसह बॉलिवूड अभिनेत्रींची कॉन्सर्टला हजेरी, आयोजकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 2:02 PM

Grand hyatt party in mumbai, action against organizers : या कॉन्सर्ट कार्यक्रमात अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टन्सिंगबाबत विचाराल तर त्याचा फज्जा उडाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता देशासह जगात ओमायक्रोन हायपाय पसरत असताना मुंबईमध्ये सध्या जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू केले आहे.

मुंबईतील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये कोरोनाच्या नियमांना हरताळ फासून कॅनेडियन रॅपर एबी ढिल्लोनच्या गाण्यावर तरुणाई थिरकली. त्यात बॉलिवूडची स्टार मंडळींचा सहभाग होता. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ग्रँड हयात हॉटेलमधील या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, जान्हवी कपूर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही दिग्गज मंडळी देखील हजर होती. कॅमेऱ्यात ही नामांकित मंडळी कैद झाली आहेत. 

या कॉन्सर्ट कार्यक्रमात अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टन्सिंगबाबत विचाराल तर त्याचा फज्जा उडाला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता देशासह जगात ओमायक्रोन हायपाय पसरत असताना मुंबईमध्ये सध्या जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू केले आहे.

कलम १४४ लागू असताना कालीना येथील ग्रँड हयातमध्ये कार्यक्रमाला परवानगी कशी मिळाली हा मोठा प्रश्न उपस्थित राहत आहे. या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र दिसून येत आहे. सोशल डिस्टन्स नाही, मास्क नाही.  कॅनेडियन रॅपर  धील्लोनचा लाईव्ह कॉन्सर्टचा कार्यक्रम रविवारी येथे आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याप्रकरणी या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसSara Ali Khanसारा अली खानSara Tendulkarसारा तेंडुलकरSachin Tendulkarसचिन तेंडुलकर