Casting director Aarti Mittal Arrested: मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तम हिला अटक केली आहे. आरतीवर देहव्यापार म्हणजे सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं आणि तिच्या तावडीतून दोन मॉडल्सची सुटका केली. पोलिसांनी यासाठी एक प्लान तयार केला होता. मुंबई पोलिसांच्या समाजसेवी ब्रांच दोन नकली ग्राहकांना पाठवलं आणि दोन मॉडल्सना वाचवलं. एका मॉडलला रिहॅब सेंटरला पाठवण्यात आलं. एकीची पोलीस चौकशी करत आहेत. ही पूर्ण घटना पोलिसांनी स्पाय कॅमेराच्या मदतीने रेकॉर्डही केली आहे. आरती विरोधात अनेक कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
मिड-डे च्या एका रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सोशल सर्विस ब्रांच या प्रकरणाची चौकशी केली. पुरावा म्हणून घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. आरोपी आरती हरिश्चंद्र मित्तल सिनेमांसाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करते. ती ओशिवरा येथील आराधना सोसायटीमध्ये राहते.
पोलिसांनी सांगितलं की, आरती मित्तल अशा मॉडल्सना आपल्या जाळ्यात ओढत होती ज्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्ससाठी तिच्याकडे येत होत्या. ती त्यांना देह व्यापारासाठी चांगल्या पैशांची ऑफर देत होती. पोलिसांनी सांगितलं की, पोलीस इन्स्पेक्टर मनोज सुतार यांना सूचना मिळाली होती की, आरती देह व्यापाराचं रॅकेट चालवत आहे.
नकली ग्राहक बनून गेले पोलीस
यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली आणि एका ग्राहकाच्या रूपात आरती मित्तलकडून आपल्या मित्रांसाठी 2 तरूणी मागवल्या. आरतीने यासाठी 60 हजार रूपयांची मागणी केली आणि पोलीस अधिकारी मनोज सुतार यांच्या फोनवर 2 मॉडल्सचे फोटोही पाठवले. त्यांना सांगण्यात आलं की, या मॉडल्स जुहू किंवा गोरेगावच्या हॉटेल्समध्ये येतील.
पोलिसांनी बनवला व्हिडिओ
मनोज सुतार यांनी गोरेगावच्या एका हॉटेलमध्ये 2 रूम बुक केल्या आणि 2 नकली ग्राहक म्हणून पोलिसांना पाठवले. जेव्हा आरती मॉडल्ससोबत पोहोचली तेव्हा त्यांनी त्यांना कंडोम दिले. हे सगळं स्पाय कॅमेरात रेकॉर्ड केलं गेलं. एसएस ब्रांचने हॉटेलमध्ये धाड टाकून आरोपींना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला सूचना दिली. आरती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी दरम्यान मॉडल्सनी खुलासा केला की, आरती त्यांना 15 हजार रूपये देणार होती.