पणजी: अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत अंमली पदार्थ व्यापाराचे अंतरराष्ट्रीय रेकेट उघडकीस आले आहे. एनसीबीच्या मुंबईतील छाप्यातून मिळालेल्या माहितीवरून गोव्यातही कारवाई करून हणजुणे येथील एका हॉटेलमध्ये काम करणाºया एफ अहमद नामक व्यक्तीला एनसीबीने अटक केली आहे. हा अहमद बॉलिवूडमधील मोठ्या हस्तींना ड्रग्स पुरविण्याचे काम करीत असल्याचा एनसीबीला संशय आहे.
कॅनडा आणि अमेरिकेतून दिल्ली, मुंबई गोवा आणि बंगळूरपर्यंत अंमली पदार्थ पोहचविण्याचे एक नियोजनबद्द रेकेटच एनसीबीने उघडकीस आणले आहे. या रेकेटच्या एका एफ अहमद नामक सूत्रधाराला गोव्यात कळंगूट येथे अटक करण्यात आली आहे. एनसीबीचे अधिकारी के पी एस मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत फार मोठा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. या अंमली पदार्थाला बड असे म्हणतात. उत्कृष्ट प्रतिच्या गांजापासून तो केला जातो आणि तो खूप महागडा असतो. दिल्लीत जप्त केलेला अंमली पदार्थ हा मुंबईत नेण्यासाठी आणला होता. तसेच मंबईत जप्त करण्यात आलेला अंमली २पदाथहा कॅनडाहून आणला होता आणि गोव्यात पाठविला जाणार होता. गोव्यातून तो बंगळूर व इतर ठिकाणच्या बॉलिवूड जगतातील काही हस्तींना पुरविण्यात येणार होता.
या कारवाईतील तपासादरम्यान या ड्रग रेकेटचा एक सूत्रधार गोव्यातही असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानुसार एनसीबीकडून कळंगूटच्या एका मोठे नाव असलेल्या रेस्टॉरंटवर छापा टाकला. त्या ठिकाणी काम करणाºया अहमदला अटक करण्यात आली. एफ अहमद हा या रेस्टॉरंटमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत असला तरी त्याचा खरा धंदा वेगळाच आहे. अंमली पदार्थ बंगळूरच्या काही बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींना पुरविण्याचे काम तो करीत असल्याची एनसीबीला माहिती मिळाली आहे.
बड्स म्हणजे काय?अत्यंत उत्कृष्ट प्रतीच्या गांजापासून तो बनविण्यात येतो. सामान्य गांजाच्या किंमतीपेक्षा कितीतरी पटीने त्याची किंमत अधिक असते. कोकेन या अंमली पदार्थाच्या बरोबरीने त्याची किंमत असते. एनसीबीने दिलेल्या महितीमुसार एका ग्रॅमसाठी ५ हजार रुपये एवढी किंमत असते. हा पदार्थ अमेरिका आणि कॅनडा या देशातून येतो.