सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत दिला दिलासा
By पूनम अपराज | Published: January 11, 2021 02:31 PM2021-01-11T14:31:51+5:302021-01-11T14:33:03+5:30
Sonu Sood in Bombay High Court : सोनू सूदनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी १३ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
कंगना राणौत आणि मुंबई महानगरपालिका यांच्यात रंगलेल्या वादानंतर आता सोनू सूदविरुद्ध मुंबई महानगरपालिका असा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पालिकेने जुहू येथील ६ मजली रहिवासी इमारतीत कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरू केल्याचा आरोप करताना सोनू सूदवर महाराष्ट्र राज्य शहर नियोजन कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याविरोधात सोनू सूदनंमुंबईउच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी १३ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
पालिकेने ४ जानेवारी रोजी जुहू पोलीस ठाण्यात सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटलं होतं की, सोनू सूदने जुहू येथील शक्ती सागर रहिवासी इमारतीचं कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकामात बदल करण्यात आला आहे. प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय अशाप्रकारे कोणतेही अनधिकृत बदल करता येत नाहीत असं बीएमसीने सांगितले. सोनू सूदच्या वतीनं वकील डी पी सिंग यांनी मुंबईउच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम न केल्याचा दावा केला आहे.
Bombay High Court adjourns hearing in a case related to BMC issuing notice to actor Sonu Sood for illegal construction at his residence, till January 13. The Court has also granted protection to the actor from any coercive action till January 13.
— ANI (@ANI) January 11, 2021
न्यायाधीश पृथ्वीराज चव्हान यांच्या खंडपीठाकडे सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ''याचिकाकर्ता ( सोनू सूद) यांनी इमारतीच्या आराखड्यात कोणताही बदल केलेला नाही. महाराष्ट्र राज्य शहर नियोजन कायद्यांतर्गत ज्या बदलांना मान्यता आहेत, तेच करण्यात आले आहेत,''असे सिंग यांनी सांगितले.
सोनू सूदला पालिकेने ऑक्टोबरमध्ये नोटीस पाठवली होती, या नोटिशीविरोधात त्याने स्थानिक कोर्टात (सिव्हिल कोर्ट) धाव घेतली होती. सिव्हिल कोर्टाने सोनू सूदला ३ आठवड्यांची मुदत हायकोर्टात जाण्याची दिली होती. मुंबई उच्च न्यायालायने सूदला १३ जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने होणाऱ्या कारवाईविरोधात सरंक्षण दिले आहे.
सोनू सूद मुंबई उच्च न्यायालयाने देखील १३ जानेवारीपर्यंत दिला दिलासा pic.twitter.com/AEhxWNkyqH
— Lokmat (@MiLOKMAT) January 11, 2021