मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या आरोपीला गुजरातमधील वडोदरा येथून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर गुन्हे शाखेचे पथक त्याची चौकशी करत आहे.
मुंबईपोलिसांनी आरोपीच्या अटकेला दुजोरा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला वडोदरा येथून अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने मंगळवारी आरबीआयला धमकीचा ईमेल पाठवला होता.
आरोपीने मंगळवारी आरबीआयला मेलवर धमकी दिली होती. आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह ११ ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे त्या व्यक्तीने मेलमध्ये लिहिले होते. आरोपीने आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा राजीनामाही मागितला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
घोटाळ्यातील आरोपी
आरोपीने तो 'खिलाफत इंडिया'चा सदस्य असल्याचे सांगितले होते. त्यांनी लिहिले होते, 'आरबीआयने खासगी बँकांच्या सहकार्याने भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, काही बँकिंग अधिकारी आणि भारतातील काही प्रसिद्ध मंत्री सामील आहेत. यासाठी आपल्याकडे पुरेसे ठोस पुरावे आहेत.