शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
3
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
4
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
5
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
6
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
7
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
8
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
9
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
10
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
11
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
12
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
13
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
14
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
15
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
16
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
17
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
18
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
19
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
20
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर

गुजरात मधून येऊन सट्टेबाज चालवतात भाईंदरच्या हॉटेलात क्रिकेटवर सट्टा; पोलिसांच्या धाडीत १० जणांना पकडले 

By धीरज परब | Published: May 11, 2023 8:58 PM

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड - भाईंदरच्या हॉटेल मध्ये क्रिकेटवर गुजरात मधील सट्टेबाज  येऊन सट्टा चालवत असल्याचे नवघर पोलिसांच्या धाडीत उघडकीस ...

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदरच्या हॉटेल मध्ये क्रिकेटवर गुजरात मधील सट्टेबाज  येऊन सट्टा चालवत असल्याचे नवघर पोलिसांच्या धाडीत उघडकीस आले आहे . पोलिसांनी सट्टेबाजांसह हॉटेलच्या दोघा व्यवस्थापकांना अटक केली असून हॉटेल चालक - मालक यांना देखील आरोपी केले आहे . 

नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांना माहिती मिळाली कि , आझाद नगर येथील द क्राऊन हॉटेल मधून क्रिकेटवर सट्टा खेळवला जात आहे . त्यानुसार सहायक निरीक्षक योगेश काळे व गणेश केकाण सह नवनाथ घुगे , भूषण पाटील , तंत्रज्ञ करण शाह आदींच्या पथकाने हॉटेल मधील दोन खोल्यांवर धाड टाकली . 

दोन्ही खोल्यां मध्ये आयपीएलच्या कोलकत्ता व पंजाब संघातील क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळवला जात होता . पोलिसांनी  फरहान फिरोज चौरावाला (२७) , चिराग रोहीतभाई रावल (४०) , नजीम इकबाल लुहार (२६),  पार्थ राजु बारोट (३३) , सनाउल गुलाम दाढी (२३) , मोईन सलीम घाँची (२४) , वसीम सलीमभाई घाँची (२९) व राकीब शरीफ दाढी (२२) ह्या सट्टेबाजांना लॅपटॉप , मोबाईल आदींसह ताब्यात घेतले . मोबाईल मध्ये इतरांच्या नावांची सिमकार्ड सट्ट्या साठी वापरले जात होते . 

 हे सर्व सट्टेबाज गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील हालोल , पावगड मार्गावर राहणारे तर चिराग रावल हा अहमदाबादच्या सारंगपूर , खाडिया येथील आहे. सट्ट्याचे कटिंग ते गुजरातच्या गोध्रा येथील पप्पीभाई कडे करतात . हॉटेल मधून सट्टा चालवण्यात संगनमत असलेल्या हॉटेलचे व्यवस्थापक संजय विठ्ठल शेट्टी (५०) व अँथोनी जॉन डिसोजा (२८) याना सुद्धा पोलिसांनी पकडले असून हॉटेलचे चालक - मालक यांना आरोपी केले आहे . नवघर पोलीस ठाण्यात ९ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

टॅग्स :IPLआयपीएल २०२३