शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
2
'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार
3
पुण्यात भाजपला मोठा धक्का; पाच पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम, हाती घेतली तुतारी
4
मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
5
बॉयफ्रेंडसोबत वेगळ्याच हॉटेलमध्ये सापडली मिस युनिव्हर्सची स्पर्धक; फायनलपूर्वीच काढून टाकले...
6
अधिकाऱ्यांना थप्पड मारणाऱ्या नरेश मीणाला अटक, सामरावता गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
7
F&O मध्ये Zomato, Dmart, BSE, Adani सह होणार ४५ नव्या शेअर्सची एन्ट्री, पाहा संपूर्ण लिस्ट
8
"आयुष्याच्या चौकटीत अडकलो...", सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिषेक बच्चनने व्यक्त केल्या भावना
9
"संविधान बदलण्याचा घाट कोण घालत असेल तर…", रामदास आठवलेंची महाविकास आघाडीवर टीका
10
हम तो डुबेंगे, तुझको भी ले डुबेंगे! पाकिस्तानी क्रिकेटरने तोडले अकलेचे तारे; म्हणाला- भारताला...
11
हॉटेलमध्ये टीप देणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
12
...म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व ठरतं इतरांपेक्षा वेगळं; पाच प्रमुख मुद्दे
13
भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं? 
14
सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला
15
'पुष्पा'मधील आयटम साँगसाठी समांथाने घेतले ५ कोटी रुपये, तर सीक्वलसाठी श्रीलाला मिळाले फक्त इतके कोटी
16
Banko Products Bonus Shares : १७ वर्षांनंतर 'ही' कंपनी पुन्हा देणार बोनस शेअर; मिळणार एकावर १ शेअर फ्री, जाणून घ्या
17
Asia Cup स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; पंत-हार्दिकसह या १३ वर्षीय खेळाडूला संधी
18
Children's Day 2024: या बालदिनी LIC च्या 'या' चिल्ड्रन स्कीममध्ये करा गुंतवणूक, मुलांचं भविष्य होईल सुरक्षित
19
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
20
'कांतारा चाप्टर १'साठी ऋषभ शेट्टीने उभारलाय ८० फूट उंच कदंब साम्राज्याचा भव्य सेट, 'या' ठिकाणी सुरु आहे शूटिंग

बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेणारा जेरबंद, तीन बँकांची फसवणूक, गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 7:44 AM

अर्नाळा पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा नोंद केला होता.

नालासोपारा : विविध बँकांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेऊन फसवणूक करणाऱ्या दीपक गुलाबचंद शुक्ला यास गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.

२२ फेब्रुवारी २०१८ ते १९ ऑगस्टदरम्यान आरोपी चेतन शहा, विनोद मिश्रा, पंकज तिवारी आणि दीपक शुक्ला यांनी आयडीएफसी फस्ट बँक लि.ची हेतुपुरस्सर फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार केली. त्याद्वारे आयडीएफसी फस्ट बँकेमधून २९ लाख २९ हजार २५१ रुपये कर्ज मिळवून बँकेची फसवणूक केली होती.

अर्नाळा पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकरिता गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचे तांत्रिक विश्लेषण व माहिती मिळवली. आरोपी दीपक गुलाबचंद शुक्ला (३४) याला चिखली, पिंपरी-चिंचवड येथून ताब्यात घेतले. 

दीपकची चौकशी केल्यानंतर त्याच्या साथीदारांनी आयडीएफसी बँक, येस बँक, सारस्वत बँकेत अशाच प्रकारे बनावट कागदपत्रे सादर करून त्याद्वारे ८५ लाख रुपये कर्ज मिळवून बँकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-३ चे पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजित टेलर आदींनी तपास केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी