पुणे : ड्रग्जमाफिया ललित पाटील याच्यासह रोहितकुमार चौधरी आणि शिवाजी शिंदे या आरोपींची पोलिस कोठडी न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत वाढविली. या तिघांची पोलिस कोठडी मंगळवारी संपली होती. त्यांना शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायाधीश व्ही.ए. कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या जंगम मालमत्तेव्यतिरिक्त त्यांनी टोळीच्या माध्यमातून पुणे, मुंबई, नाशिक अथवा इतर ठिकाणी कोठे कोठे स्थावर जंगम मालमत्ता खरेदी केली आहे काय? याबाबत तपास करायचा आहे असे सरकारी वकील विजय फरगडे यांनी सांगितले. आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी त्यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
रोहितकुमार चौधरी बिहारच्या एका खेड्यातील तरुण आहे. त्याचे शिक्षण जेमतेम झाले आहे. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया करून मेफेड्रॉन बनविणे आणि त्याचे प्रशिक्षण देणे, हे चौधरीला शक्य नाही, असा दावा त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला.