शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक; सार्वजनिक शौचालयं बनली गुन्हेगारांचे अड्डे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 3:39 PM

शौचालयाच्या गच्चीवरून काल मध्यरात्री २. ३० वाजताच्या सुमारास जयपाल राजपूत याने विनापरवाना गावठी कट्यातुन गोळीबार केला. तर त्याचा दुसरा साथीदार विशाल वाल्मिक याने चॉपर बाळगला. याप्रकाराने परिसरात दहशत पसरली होती.

उल्हासनगर - महापालिका सार्वजनिक दुमजली शौचालयाच्या गच्चीवरून गोळीबार करणाऱ्या दोघांना शस्त्रासह अटक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाची झाडाझडती घेण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे.

उल्हासनगर कॅम्प नं -1 शहाड फाटक परिसरात एमएमआरडीएने बांधलेले दुमजली सार्वजनिक शौचालये आहे. पालिका अशा शौचालयाची देखभाल व्यवस्थित करीत नसल्याचा गैरफायदा समाजकंटकांनी घेतला. यातूनच गोळीबाराचा प्रकार झाला आहे. शौचालयाच्या गच्चीवरून काल मध्यरात्री २. ३० वाजताच्या सुमारास जयपाल राजपूत याने विनापरवाना गावठी कट्यातुन गोळीबार केला. तर त्याचा दुसरा साथीदार विशाल वाल्मिक याने चॉपर बाळगला. याप्रकाराने परिसरात दहशत पसरली होती.

शहरातील सार्वजनिक शौचालये गुन्हेगाराचे आश्रयस्थान झाले असून पालिकेने एमएमआरडीएने बांधलेले 180 दुमजली शौचालये ताब्यात घेण्याची मागणी होत आहे. सद्यस्थितीत शौचालये सामाजिक संस्थेच्या ताब्यातून काढून घेऊन स्वतःकडे घेण्याची मागणी होत आहे. गोळीबारप्रकरणी दोघांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक करून शस्त्र ताब्यात घेतली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारulhasnagarउल्हासनगर