पंढरपूर : तुझी नेमणूकीस असलेली पदस्थापना चुकीची आहे. त्याबाबत लेखापरीक्षण अहवालामध्ये नोंद घेवून नोकरी घालवतो. परंतु लाच दे नोकरी वाचवतो म्हणून ६० हजार रुपयांची लाच स्विाकरणाºया जिल्हा परिषद बांधकाम विभागातील दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पंढरपुरातील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता कार्यालयातील शाखा अभियंता ज्ञानेश्वर सुदाम पवार (रा. पाटकुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर) व सोलापूर येथील स्थानिक निधी लेखा विभागातील वरीष्ठ लेखा परीक्षक धर्मा गोपीचंद पवार (रा. फ्लॅट नं. ४४, लक्ष्मीद्वीप अपार्टमेंट, वैरशैव नगर, विजापूर रोड, सोलापूर) अशी नावे आहेत.
पंढरपुरातील जिल्हा परीषद बांधकाम विभाग येथे तक्रारदार हे स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक म्हणून नोकरी करत आहेत. त्यांच्या कार्यालयाची सोलापुरातील स्थानिक निधी लेखा कार्यालयातील वरीष्ठ लेखापरीक्षक धर्मा पवार यांनी लेखा परीक्षण केले होते. त्यामध्ये तक्रारदार व त्यांच्या कार्यालयात नेमणूकीस असलेले आणखी एक कर्मचारी यांची पदस्थापणा चुकीची असून त्याबाबत लेखापरिक्षण अहवालामध्ये नोंद घेऊन नोकरी घालवतो असे म्हणून तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. ३० आॅक्टोंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक यांच्याकडून तक्रारदार यांचे तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात तक्रारदार यांच्याकडे धर्मा पवार व ज्ञानेश्वर पवार यांनी पंचासमक्ष १ लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ६० हजार रुपये घेण्याचे कबुल केले होते. ३१ आॅक्टोंबर रोजी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अंभीयंता कार्यालयात लाचेचा सापळा रचण्यात आला होता.त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून ६० हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर ज्ञानेश्वर पवार व धर्मा पवार यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रंतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, अपरपोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. जगदीश भोपळे, सहाफौजदार निलकंठ जाधव, पोह. संजय बिराजदार, पोह. चंदकांत पवार, पोकॉ. सिध्दाराम देशमुख, पोकॉ. प्रफुल्ल जानराव, पोकॉ शाम सुरवसे यांनी केली आहे.