अमेरिकेच्या (US) फ्लोरिडामध्ये (Florida) मन हेलावून टाकणारी एक घटना घडली आहे. एका व्यक्तीने 13 वर्षीय मुलीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. मुलीवर धारदार शस्त्राने तब्बल 114 वेळा वार (Boy Stabbed Cheerleader 114 Times) केले गेले आहेत. धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भयंकर बाब म्हणजे या हत्येनंतर मुलीच्या पायावर कर्मा असं देखील लिहिण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
द सनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, तपासात असं समोर आलं आहे, की आरोपीने या हत्येआधी काही दिवसांपूर्वी आपल्या मित्रांजवळ म्हटलं होतं, की त्याला चाकूनं कोणालातरी मारायचं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे घटनेतील आरोपीही अल्पवयीन आहे, त्याचं वय फक्त 14 वर्ष आहे. ट्रिस्टिन बॅली असं या मुलीचं नाव असून हत्येनंतर कोणीतरी ट्रिस्टिनच्या पायावर निळ्या रंगाच्या शाईने कर्मा असं लिहिलं. तर, दुसऱ्या पायावर स्मायली काढली. हे कोणी लिहिलं याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी फ्लोरिडामधील एका तलावाजवळ झाडाच्या खालून पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. आरोपीने आपल्या मित्रांना सांगितलं होतं, की एक दिवस तो कोणालातरी याच झाडाखाली आणून मारणार आहे. तो एकटाच हातात चाकू घेऊन कोणालातरी मारण्याचा सराव करत असे. मृत चिमुकली चिअरलीडर होती. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस सध्या आरोपी आणि त्याच्या ओळखीच्या लोकांची चौकशी करत आहेत. त्याने मुलीला का मारलं याचा पोलीस शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
खळबळजनक! आंतरधर्मीय विवाह केलेल्या महिलेचा गूढ मृत्यू; तब्बल 11 दिवसांनी कबरीतून बाहेर काढला मृतदेह
उत्तर प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. झाशीमध्ये कुटुंबाच्या मर्जीविरोधात आंतरधर्मीय विवाह केलेल्या एका विवाहितेचा गूढ मृत्यू (Death) झाला आहे. संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अफरोज उर्फ निलम असं या महिलेचं नाव असून तिच्या माहेरच्या मंडळींनी हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्या विवाहितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी या महिलेचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या छतरपूरची रहिवासी असलेल्या निलम अहिरवारने तब्बू उर्फ तालिबसोबत सहा वर्षांपूर्वी आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यानंतर निलमचं नाव हे अफरोज बेगम असं झालं. सहा जुलै रोजी अचानक तिची तब्येत बिघडली. उपचारासाठी घेऊन जात असताना झाशीजवळ तिचा मृत्यू झाला. त्यामुळे झाशीच्या प्रेमनगरमधील कब्रिस्तानात अफरोजला दफन करण्यात आलं.