पाटणा - बिहारमधील छपरा येथे महिला रेल्वे कर्मचाऱ्याच्या हत्याकांडामध्ये एक सनसनाटी गौप्यस्फोट झाला आहे. या महिला रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या अवैध संबंधांमधून झाली होती. या प्रकरणी एका डाटा ऑपरेटरला अटक करत सोनपूर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. सोनपूरच्या रेल्वे मायक्रोवेव्ह कॉलनी स्थित क्वार्टरमध्ये १८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा महिला रेल्वे कर्मचारी सुनिता देवी हिची हत्या करण्यात आली होती. (The boyfriend along with friends murdered the female railway employee, and later found the body in the flat)
२० सप्टेंबर रोजी पोलिसांनी तिचा मृतदेह जप्त केला होता. मृत सुनैना देवी येथे रेल्वे रनिंग रूममध्ये सहाय्यक आचारी या पदावर कार्यरत होती. एएसपी अंजनी कुमार यांनी सांगितले की, सदर महिला रेल्वे कर्मचाऱ्याची सुनियोजित कारस्थान आखून हत्या करण्यात आली. या हत्याकांडामध्ये चार तरुणांचा सहभाग होता. हत्याकांडामध्ये अटक करण्यात आलेला धीरज कुमार उर्फ सुमित कुमार उर्फ चुन्नू हा रेल्वेमध्ये डाटा ऑपरेटरचे काम करतो. मृत महिलेसोब अनैतिक संबंध होते.
मृत सुनैना हिने त्याला वॅगन-आर कार खरेदी करून दिली होती. तसेच ती त्याला सतत पैसेसुद्धा देत असे. गेल्या १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजेसाठी तिने कारची मागणी केली होती. तसेच दिलेले पैसेही परत मागितले होते. धीरज त्यावेळी बनारसला गेला होता. तिथे जाऊन त्याने फोन बंद केला होता. १८ तारखेला तो मित्रांसह आला. त्यानंतर त्याने सदर महिलेच्या क्वार्टरमध्ये जात उशीच्या मदतीने तिचा गळा आवळला. तसेच तिच्या डोक्यावर वजनदार वस्तूने वार करून तिची हत्या केली. या गुन्ह्यात त्याला मित्रांनी मदत केली. दरम्यान, त्याच्याकडून महिलेची चेन पोलिसांनी हस्तगत केली आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच धीरजने गुन्हा कबूल करून इतर आरोपींबाबतही माहिती दिली. त्यांना शोधण्यासाठी पोलीस आता छापेमारी करत आहेत.
मृत महिला सुनैना देवी हिचे सासर वैशाली जिल्ह्यामधील गावात होते. ती दिवंगत रेल्वे कर्मचारी कृष्णनंदन सिंह यांची पत्नी होती. पतीच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर तिला रेल्वेत नोकरी लागली होती. ती पुढच्या वर्षी निवृत्त होणार होती.