अलीकडच्या काळात लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लग्न करून पैसे घेऊन फरार होण्याच्या बातम्या वाचायला मिळतात. आता एका महिलेने लग्नाच्या नावाखाली तिच्यासोबत झालेल्या फसवणुकीबाबत खुलासा केला आहे. डेटिंग वेबसाईटच्या माध्यमातून या युवतीची ओळख एका मुलाशी झाली. हा संवाद सातत्याने वाढत गेला. या काळात युवतीचा मुलावर प्रचंड विश्वास बसला.
हळूहळू ही ओळख प्रेमात बदलली. युवतीने मुलाला एक एक करत तब्बल २५ लाख रुपये दिले. इतकी मोठी रक्कम दिल्यानंतर युवतीला मुलाबाबतचं सत्य उघड झाले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. कुलदीप नावाची युवतीने एका कार्यक्रमात हा खुलासा केला. ती म्हणाली की, मी किरणसोबत एका डेटिंगसाइटवर जोडली गेली. आमच्यात ईमेलद्वारे संवाद झाला. एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले. सुरुवातीला सगळं काही ठीक सुरू होतं. किरणचा प्रोफाइल मला आवडला होता. तो फोटोत एकदम रिअल वाटत होता. त्यानंतर गोष्टी बदलू लागल्या. कुलदीपकडून किरण पैसे मागू लागला.
कुलदीपनं सांगितले की, २०१३ तिचा पार्टनरसोबत घटस्फोट झाला. त्यानंतर तिने न्यूयॉर्कमध्ये राहण्याचा प्लॅन बनवला. दुसरा कुणी चांगला पार्टनर मिळेल अशी तिला आशा होती. त्यासाठी तिने डेटिंग वेबसाईट ज्वाइन केली. त्यानंतर तिची ओळख स्वत:ला गर्व्हनमेंट कंसल्टेंट सांगणाऱ्या युवकाशी झाली. तो लग्नासाठी मुलगी शोधत होता. कुलदीपला किरण आवडू लागला. परंतु काही दिवसाने त्याने पैसे मागण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा त्याने पासपोर्ट चोरी झाल्याच्या नावाखाली ५० हजार रुपये मागितले. पैसे मिळाल्यानंतर पुन्हा किरणने कुलदीपकडे पैसे देण्याची विनंती केली. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या कारणास्तव किरण पैसे मागत राहिला आणि कुलदीपही पैसे देत राहिली.
कुलदीपनं किरणला एकूण २० लाख रुपये दिले. त्यानंतर तिने पैसे देण्यास नकार दिला. किरणला ईमेल पाठवला परंतु उत्तर मिळालं नाही. सर्वकाही संपलं असं मला वाटलं. परंतु त्यानंतर कुलदीपला एक ईमेल आला. हा ईमेल FBI कडून आल्याचं कळालं. किरणला अटक केली होती. परंतु जर मी दिलेले पैसे हवे असतील तर त्यांना ५ लाख रुपये द्यावे लागतील. ज्यानंतर ते ५ लाख परत देतील. त्यानंतर मी ५ लाख दिले. मात्र मला काहीच उत्तर आले नाही. मी ऑनलाइन रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर डेटिंग वेबसाइटवर अनेक प्रोफाइलवर किरणचा फोटो लागल्याचं सत्य युवतीसमोर उघड झाले.