लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आचोळे रोडवरील साडी कंपाउंडमध्ये रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एका प्रियकराने प्रेमिकेची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. तुळींज पोलिसांनी आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले असून, महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करत शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. तुळींज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साडी कंपाउंडच्या जय अंबे वेल्फेयर सोसायटीत १ सप्टेंबरपासून ज्योती गौतम (२३) आणि अविनाश कुमार (२८) हे दोघे भाड्याने लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते. तिचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपी अविनाशने तिची रविवारी संध्याकाळच्या सुमारास गळा आवळून हत्या केली आहे. तुळींज पोलिसांनी दुजोरा दिला आहे.