शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

डॉक्टर गर्लफ्रेंडची हत्या करून स्वत:ही जीव देण्याचा बॉयफ्रेंडने केला प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 10:23 AM

पोलीस कार्यवाहीनंतर महिलेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला. या प्रकरणात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

जम्मू - राज्यात श्रद्धा हत्याकांडासारखी खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील जानीपूर परिसरात बुधवारी रात्री जौहर महमूदने गर्लफ्रेंड डॉक्टर सुमेधाची हत्या चाकूने वार करत केली आहे. जौहरने केलेल्या हल्ल्यात सुमेधाचा जागीच मृत्यू झाला आहे. गर्लफ्रेंडला ठार केल्यानंतर बॉयफ्रेंड जौहरनेही स्वत:वर वार करत जीव देण्याचा प्रयत्न केला. स्वत:च्या पोटावर केलेल्या हल्ल्यामुळे जौहर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले की, जौहर महमूदची प्रकृती चिंताजनक असून त्याचा जबाब नोंदवणे बाकी आहे. जबाब नोंदवल्यानंतर त्याने सुमेधाची हत्या का केली हे स्पष्ट होईल. २६ वर्षीय डॉक्टर सुमेधा ही तालाब तिल्लो गोल पुली इथं राहणारी होती. तर आरोपी जौहर हा भद्रवाह येथे राहायला होता. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाले. याच वादातून जौहरने चाकू मारून सुमेधाची हत्या केली. त्यानंतर त्याच चाकूने स्वत:चा जीव देण्याचा प्रयत्न झाला. 

पोलीस कार्यवाहीनंतर महिलेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला. या प्रकरणात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. या घटनेपूर्वी आरोपी जौहरने त्याच्या फेसबुकवर पोस्ट केली होती. काही खासगी कारणास्तव स्वत:चे जीवन संपवत असल्याचं तो म्हणाला होता. याप्रकरणी डीएसपी विक्रम सिंह, एसएचओ विजय कुमार, एक उपनिरिक्षक यांच्या नेतृत्वात एक तपास पथक नेमले आहे. डीएसपी या प्रकरणाचा अहवाल आयओ यांना देतील. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत युवतीमध्ये संबंध होते. त्या दोघांनी जम्मूच्या डेंटल कॉलेजमधून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीचं शिक्षण पूर्ण केले होते. सुमेधा त्यानंतर एमडीएस शिक्षणासाठी जम्मूच्या बाहेर गेली. ७ मार्चला होळीसाठी सुमेधा घरी आली होती. तेव्हा ती बॉयफ्रेंडला भेटायला गेली. त्याठिकाणी काही कारणांवरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर आरोपीने तिला चाकूने मारून टाकले. अद्याप या प्रकरणावर पोलिसांकडून तपास सुरू आहे.