ऑनलाइन वस्तू मागवताना साबण, दगड मिळण्याच्या अनेक घटना घडत आहेत. ग्राहक ई-कॉमर्स साइटवरून आयफोन ऑर्डर करतात आणि त्या बदल्यात त्यांना साबण किंवा काहीतरी मिळते. हे फक्त भारतातच घडते असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.
आता याबाबत ब्राझीलमधून एक बातमी समोर आली आहे. रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, ब्राझीलच्या एका अभिनेत्यासोबतही अशीच घटना घडली आहे. ब्राझिलियन अभिनेत्याने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून Apple Watch 6 ऑर्डर केले, परंतु ते मिळाले नाही. त्याऐवजी, त्याला एक दगड मिळाला.
MacMagazine मधील एका रिपोर्टनुसार, ब्राझिलियन ब्लॉगर Lo Bianco यांनी सांगितले की, प्रसिद्ध अभिनेता Murilo Benício ने किरकोळ विक्रेता Carrefour कडून 4 44mm Apple Watch Series 6 ऑर्डर केली. 12 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांची ऑर्डर मिळाली.
इतके दिवस वाट बघूनही अभिनेत्याला Apple Watch मिळाले नाही. Murilo Benício ला ऑनलाइन आलेल्या पार्सलमध्ये एक दगड मिळाला. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, अभिनेत्याने Apple Watch 6 साठी सुमारे 530 डॉलर दिले होते. म्हणजेच जवळपास 40,000 रुपये आहे.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, जेव्हा अभिनेत्याने पार्सल उघडले, तेव्हा अॅपल वॉच ऐवजी एक दगड पाहून त्याला धक्काच बसला. याबद्दल अभिनेत्याने कंपनीशी संपर्क साधला, तेव्हा Carrefour ने त्याला मदत करण्यास नकार दिला.
9To5Mac च्या रिपोर्टनुसार, यानंतर अभिनेत्याने कंपनीवर दावा दाखल केला. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की, अभिनेत्याने पुन्हा कंपनीसोबत डील केली आणि Carrefour ने त्याला जवळपास 1500 डॉलर देण्याचे मान्य केले. Apple Watch 6 गेल्या वर्षी लॉन्च झाले होते.