पाकिस्तान - क्वेट्टातल्या मिशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटानेपाकिस्तान आज हादरलं आहे. बलुचिस्तानमधल्या एका मशिदीत हा भीषण बॉम्बस्फोट झाला असून या स्फोटात १५ जण मृत्युमुखी पडले आहेत तर २१ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक माहिती म्हणजे मृतांमध्ये क्वेट्टाचा पोलीस अधिकारी आणि मशिदीचा इमाम यांचा समावेश आहे.
शुक्रवार असल्याने प्रार्थनेसाठी मशिदीत जास्त लोक जमा झाले होते. मशिदीचा इमाम आणि पोलीस उपअधीक्षक अमानुल्लाह यांचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासन आणि क्वेट्टा डीआयजी अब्दुल रझाक चिमा यांनी दिली. नमाजाची वेळ असल्याने हा बॉम्बस्फोट झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुरक्षा दल आणि बीडीएस (बॉम्ब नाशक पथक) घटनास्थळी पोचले असून छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांची शोध मोहिम सुरू असल्याचं पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितलं आहे. बॉम्बस्फोट करणाऱ्यांना शोधून काढून असंही पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.