ठळक मुद्दे आयबीची परवानगी न घेता विदेशी बँकेत खोललेल्या खात्यात 500 कोटी कुठून आले याचा तपास ईडी करतेय.
उद्योजक अविनाश भोसले यांच्याकार्यालयावर इडीने (अंमलबजावणी संचालनालय) पुन्हा एकदा छापा टाकला आहे. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी उद्योजक अविनाश भोसले यांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 2 वेळा ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आज पुण्यात एबीआयएलया विद्यापीठ रस्त्यावरच्या भोसले यांच्या कार्यालयात ईडीची टीम सकाळी 8.30 पासून तपासाकरता पोहोचली आहे.
भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ईडीलाच चक्क बजावली नोटीस; नेमकं काय घडलं? वाचा
आयबीची परवानगी न घेता विदेशी बँकेत खोललेल्या खात्यात 500 कोटी कुठून आले याचा तपास ईडी करतेय. या प्रकरणी यापूर्वीही त्यांची दोन वेळा चौकशी झाली होती आणि छापा टाकण्यात आला होता.
शिवसेना नेत्यांच्या अडचणी संपेनात; उद्धव ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराची ईडीकडून चौकशी