Breaking: पवन गुप्ताची याचिका फेटाळली; उद्याच फासावर लटकवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 11:49 AM2020-03-19T11:49:58+5:302020-03-19T12:00:44+5:30
निर्भया अत्याचार: दोषींना फाशी देणारा जल्लाद पवन तिहार तुरुंगात दाखल झाला आहे.
नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींकडून फाशी टाळण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले जात आहेत. बलात्कारावेळी अल्पवयीन असल्याचे सांगत बुधवारी एका दोषीने याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तीन दोषींनी त्यांच्या कुटुंबीयांची बंद खोलीमध्ये शेवटची भेट घेतली आहे.
दोषींना फाशी देणारा जल्लाद पवन तिहार तुरुंगात दाखल झाला आहे. त्याने बुधवारी तुरुंगातील कर्मचाऱ्यांना डमी दोषी बनवून फाशी देण्याची ट्रायल घेतली. यामुळे उद्या 20 मार्चला पहाटे साडेपाचला दोषींनी फाशी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: Court gave them so many opportunities that they have become habituated of bringing something ahead of hanging&get it postponed. Now, our Courts are aware of their tactics. Nirbhaya will get justice tomorrow. https://t.co/NzSVKZFs1fpic.twitter.com/6YiG53wj8v
— ANI (@ANI) March 19, 2020
यावर निर्भयाची आई आशा देवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने त्यांना बऱ्याचदा संधी दिल्याने फाशी टाळण्यासाठी वेगवेगळी कारणे देण्य़ाची त्यांना सवय झाली होती. आता न्यायालयाला त्यांची खेळी समजली आहे. निर्भयाला उद्या न्याय नक्की मिळणार आहे, असे देवी यांनी सांगितले.
दरम्यान, चारही दोषींनी दिल्लीतील पटियाला न्यायालयामध्ये अर्ज दाखल करत फाशी रोखण्याची मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विचाराधीन असलेल्या याचिकांचा उल्लेख केला असून कोरोनालाही मध्ये घातले आहे. कोरोना देशभरात पसरत असून हा काळ फाशी देण्यासाठी योग्य नसल्याचे त्यांनी यामध्ये नमूद केले आहे.
तिहारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चारही दोषींच्या मृतदेहांचे पोस्टमार्टेम डीडीयू हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. जर कोणती समस्या आढळल्यास त्यांचे अन्य हॉस्पिटलमध्येही पोस्टमार्टेम होऊ शकते. यासाठी डॉक्टरांचे पॅनेल असून कदाचित पोस्टमार्टेमचे व्हीडिओ शुटिंगही केले जाणार आहे.
भाजपा कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून केले गोमूत्र प्राशन; पण...
कच्च्या तेलाने गाठला तब्बल 16 वर्षांपूर्वीचा निचांक; मुंबईतील आजचे दर पहा
Coronavirus: हाहाकार! इटलीमध्ये 24 तासांत 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; विद्यार्थी बनले डॉक्टर
Nirbhaya Case: 'आम्हाला फासावर लटकवून देशातील बलात्कार थांबणार नाहीत पण...'
निर्भया अत्याचार: दोषींनी केली कोरोनाची 'ढाल'; न्यायालयात खेळली नवी चाल