शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

Breaking : अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणात बिहारमधून आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 12:53 PM

रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि अंबानी कुटुंबीयांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली होती.

रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि अंबानी कुटुंबीयांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन आला होता. त्यामध्ये रिलायन्स रुग्णालय उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबीयांनाही धमकी देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी एका आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

बिहारणधील दरभंगा जिल्ह्यातील मनीगाछी येथून एकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव राकेश कुमार मिश्रा असं आहे. मुंबई पोलिसांनी दरभंगा पोलिसांच्या मदतीनं आरोपीला अटक केली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीला आता मुंबईत आणण्यात येत आहे.

दरभंगाचे एसएसपी अवकाश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव राकेश कुमार मिश्रा असून तो मानसिकरित्या आजारी असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं म्हटलं. तसंच मुंबई पोलीस त्याला सोबत घेऊन गेली असून पुढील कारवाई मुंबई पोलिसांकडून होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.“५ तारखेला रिलायन्स फाऊंडेशनच्या लँडलाईनवर दोनदा अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन आला होता. त्यात हॉस्पीटल आणि अँटिलिया दोन्ही बॉम्बनं उडवण्याची धमकी दिली होती. अंबानी कुटुंबीयांच्या काही सदस्यांनाही धमकी दिली होती. या प्रकरणाची गंभीरता पाहून मुंबई पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि पथक तयार करून आरोपीच्या अटकेसाठी ते रवाना करण्यात आले. मध्यरात्री दरभंगा बिहारमधून आरोपी तेथील पोलिसांच्या सहकार्याने आरोपीचा ताबा घेतला आहे. आरोपीला घेऊन टीम मुंबईत येतेय आणि त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. याचा तपास केला जात आहे,” अशी प्रतिक्रिया यानंतर पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी दिली.

काय आहे प्रकरण?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.५७ वाजण्याच्या  सुमारास परिमंडळ २ अंतर्गत डी बी मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल प्राप्त झाला होता. सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबीयांच्या संदर्भात धमकी दिलेली होती. या धमकीच्या फोननंतर डॉ. डी.बी.मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची आला होता. तसंच यानंतर मुंबई पोलिसांनी तपासही सुरू केला होता.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्सCrime Newsगुन्हेगारी