शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

Bribe: रेती वाहतूकदाराकडून लाच घेणारा पाेलीस उपनिरीक्षक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 7:54 AM

Bribe News: ७५ हजार रुपयांची मागणी करीत तडजाेडीनंतर ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्यातील पाेलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

नागपूर : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रेतीची वाहतूक करण्यासाठी प्रति ट्रक १५ हजार रुपयांप्रमाणे पाच ट्रकसाठी ७५ हजार रुपयांची मागणी करीत तडजाेडीनंतर ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्यातील पाेलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. १) रात्री ९ वाजताच्या सुमारास बेला परिसरात करण्यात आली.दिलीप पुंडलिक सपाटे (वय ५७, फ्रेंड्स काॅलनी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या लाचखाेर पाेलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारकर्ता बिलालनगर (ता. मंगरूळपीर, जिल्हा वाशिम) येथील असून, त्यांचे काही ट्रक बेला परिसरातून रेतीची वाहतूक करतात. ही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दिलीप सपाटे याने त्यांना प्रति ट्रक १५ हजार रुपयांप्रमाणे ७५ हजार रुपयांची मागणी केली हाेती. लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीच्या नागपूर कार्यालयात तक्रार नाेंदविली व दिलीप सपाटे याला ४५ हजार रुपये देण्याचे कबूल केले.ठरल्याप्रमाणे त्यांनी दिलीप सपाटेला गुरुवारी रात्री ४५ हजार रुपये दिले आणि परिसरात दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. गुन्हा दाखल हाेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. ही कारवाई एसीबीचे पाेलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पाेलीस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक योगिता चाफले, पोलीस निरीक्षक आशिष चौधरी व वर्षा मते, सुरेंद्र सिरसाट, अनिल बहिरे, अस्मिता मल्लेलवार, अमोल मेंघरे, हर्षलता भरडकर यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण