जळगाव - तक्रारदाराविरुद्ध आलेल्या अर्जावरुन गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाचेची मागणी करुन ती स्विकारणारया नशिराबाद पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश रमेश पाटील (रा.पिंप्राळा, जळगाव) यास जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अटक केली आहे.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील 50 तक्रारदाराविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात अर्ज आल्यानंतर त्यावरुन गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हवालदार सतीश रमेश पाटील (रा.पिंप्राळा, जळगाव) याने 8 रोजी पाच हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सापळा रचुन पोलिस ठाणे आवारात लाच स्वीकारतांना सतीश रमेश पाटील यास अटक करण्यात आली.
पोलिस उपअधीक्षक गोपाल ठाकुर, निरीक्षक संजोग बच्छाव, रवींद्र माळी, अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील, सुनील शिरसाठ, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.