मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपाची लाचखोर नगरसेविका वर्षा गिरीधर भानुशाली हिला लाच प्रकरणी ठाणे न्यायालयाने ५ वर्ष कैद आणि ५ लाख दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
भाजप नगरसेविका वर्षा भानुशाली लाचप्रकारणी ५ वर्षांचा कारावास आणि ५ लाख दंड अशी शिक्षा असून दंड न भरल्यास आणखी ६ महिन्याचा कारावास भोगावा लागेल. ६ जून २०१४ रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वर्षा भानुशाली हिला तिच्या भाईंदरच्या मॅक्सस मॉल समोरील जानकी हेरिटेज इमारतीतील राहत्या घरात लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. एका गाळ्याची बेकायदेशीर उंची वाढवण्यासाठी वर्षाने १ लाख ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना तिला पकडले होते. २००७ सालच्या महापालिका निवडणूकीत वर्षा भानुशाली आणि नरेंद्र मेहता हे एकत्र पॅनल मधून अपक्ष म्हणून निवडून आले होते.