शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

बोंबला! लाईट गेले म्हणून मधुचंद्राच्या रात्री गच्चीवर जाऊन झोपला नवरदेव, संधी मिळताच नवरी फरार...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 1:17 PM

UP News : दागिन्यांसह, रोकड आणि मोबाईल घेऊन नववधू झाली पसार.

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये आपल्या मधुचंद्राच्याच रात्री नववधू वराला फसवून पळून गेल्याचा प्रकार घडला आहे. महिलेनं आपल्यासोबत सोन्याचांदीचे दागिने, ११ हजार रोख रक्कम आणि मोबाइलही पळवून नेला आहे. दरम्यान, अद्याप पीडित कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

हे प्रकरण कटरा पोलीस ठाण्याच्या पालिया दरोबस्त येथील आहे. या गावातील रहिवासी रमेश पाल सिंह यांचा मुलगा रिंकू सिंगचा विवाह कुशीनगर जिल्ह्यातील पटावा पोलीस स्थानत परिसरातील काजलसोबत निश्चित झाला होता. २७ मे रोजी सर्वजण वरात घेऊन तेथे गेले आणि २८ मे रोजी वधूला त्यांच्या गावी आणण्यात आलं. दिवसभर थकलेले सगळे लोक झोपून गेले. यानंतर त्याच रात्री अकराच्या सुमारास वीज गेली. जास्त उष्णतेमुळे वर रिंकू गच्चीवर झोपला.

अंधाराचा फायदा घेत वधूने ११ हजारांची रोकड, मोबाईल व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह इतर साहित्य घेऊन पळ काढल्याचा आरोप वराच्या नातेवाईकांनी केला आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास वीज आल्यावर रिंकू खोलीत पोहोचला. मात्र पत्नी तेथे दिसली नाही. घराचे मुख्य गेटही उघडे होते.

त्यानं पत्नीच्या नंबरवर फोन केला असता मोबाईल बंद असल्याचा सांगत होते. सासरच्या मंडळींशी संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. दोन दिवस सर्व प्रयत्न करूनही वधू परतली नाही. दरम्यान, हे प्रकरण प्रेम प्रकरणाशी निगडीत असल्याचं वाटत असल्याचं वराच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. दागिन्यांसह वधू बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. परंतु या प्रकरणी कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश