Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये लग्नाच्या दिवशी नवरी नवरदेवाची वाट बघत होती. पण नवरदेव वरातच घेऊन पोहोचला नाही. अशात संतापलेले नवरीकडील लोक तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यानंतर जे समोर आलं ते फारच हैराण करणांर होतं.
पोलिसांनी सांगितलं की, नवरदेवाचं दुसऱ्याच तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. जेव्हा तिला समजलं की, तिचा प्रियकर दुसऱ्याच तरूणीसोबत लग्न करत आहे तर तिने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. ज्यामुळे नवरदेव वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचला नाही.
सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ही घटना छिंदवाडाच्या परासियातील न्यूटनमधील आहे. इथे एका तरूणीचं लग्न बैतूल पोलीस स्टेशनमध्ये तैनात कॉन्स्टेबल सोनू सलकियासोबत ठरलं होतं. तो शिवपुरीचा राहणारा आहे. रविवारी दोघांचं लग्न होणार होतं. लग्नाच्या दिवशी नवरीकडील लोक वरातीची वाट बघत होते, पण वरात आलीच नाही. त्यांना वाटलं की, काही कारणाने वरात लेट झाली असेल. बराचवेळ वाट बघूनही वरात आलीच नाही.
वरातच आली नसल्याने लग्नासाठी आलेले पाहुणे घरी परत गेले. या गोष्टीमुळे नाराज नवरीकडील लोक पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी नवरदेवाकडील लोकांविरोधात तक्रार दाखल केली. तिथे त्यांना समजलं की, नवरदेवाविरोधात आधीच एक तक्रार दाखल आहे जी त्याच्या प्रेयसीने केली आहे.
पोलीस अधिकारी महेंद्र भगत यांनी सांगितलं की, सोनू सलकिया बैतूल पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहे. ज्याचं एका तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. ती सुद्धा बैतूलची राहणारी आहे. सोनूच्या प्रेयसीला जेव्हा हे समजलं की, तो दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करत आहे. त्यामुळे तिने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्यामुळे सोनू वरात घेऊन नवरीच्या घरी गेलाच नाही.