धक्कादायक! लव्ह मॅरेजच्या दुसऱ्या दिवशीच महिलेसोबत दगा, पतीनेच पत्नीवर घडवून आणला गॅंगरेप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 04:01 PM2022-04-14T16:01:51+5:302022-04-14T16:02:19+5:30
Madhya Pradesh Crime News : तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह दोन आरोपींना अटक केली. ही घटना इंदुरच्या आझाद नगरमधील आहे.
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Crime News ) इंदुर जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका पतीने पत्नीवर मित्रांकडून गॅंगरेप घडवून आणला. धक्कादायक बाब म्हणजे दोघांचं दोन दिवसांपूर्वी लव्ह मॅरेज झालं होतं. पतीने मित्रांना खूश करण्यासाठी हे संतापजनक कृत्य केलं. तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह दोन आरोपींना अटक केली. ही घटना इंदुरच्या आझाद नगरमधील आहे.
आझाद नगर पोलिसांनुसार, १९ वर्षीय तरूणीने गॅंगरेपची तक्रार दाखल केली. पीडित तरूणी विदिशाच्या शमशाबादची राहणारी आहे. तरूणी पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, छोटेलाल मीणा माझ्या मागे लग्नासाठी लागला होता. ९ एप्रिलला तो मला लग्न करण्यासाठी इंदुरला घेऊन आला. इथे त्याने माझ्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या दोन दिवसांनंतर त्याच मित्र आनंद मीणा आणि दीपक मीणा घरी आले. तेव्हा पती म्हणाला की, आपल्या लग्नात या दोन मित्रांनी खूप मेहनत घेतली. म्हणून त्यांना एकदा खूश कर.
पीडितेने पोलिसांना सांगितलं की, हे ऐकताच तिला धक्का बसला. तिला काहीच कळत नव्हतं की, काय होतंय. यानंतर आनंद मीणा आणि दीपक मीणा यांनी माझ्यासोबत रेप केला. त्यानंतर मी घरी जाण्याचं बोलले तर त्यांनी मला धमकी दिली की, कुणाला काही सांगितलं तर भावाचा जीव घेणार. अशीही माहिती समोर आली आहे की, तरूणी आणि छोटेलालमध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघांनी इंदुरच्या आझाद नगरमधील आर्य समाज मंदिरात लग्न केलं. छोटेलाल आणि दीपकचे वडील शेती काम करतात. तर आनंद बीकॉम सेकंड इअरला शिकतो.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तरूणी घरातून गेल्यावर तिच्या कुटुंबियांनी विदिशामध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. ती इंदुरमध्ये असल्याची माहिती मिळाली तर कुटुंबिय इथे पोलिसांकडे आले. सर्वांनी तिचा शोध घेतला. यानंतर तरूणीने पोलिसांना सगळी घटना सांगितली आरोपीने काही दिवस प्रियकर असल्याचं खोटं नाटक केलं, मग लग्नाच्या नावावर हे कृत्य केलं.