दोन वर्षात सहा लग्ने, सर्वांसमोर बाइकवरून प्रियकरासोबत पळून गेली नवरी; बघतच राहिला नवरदेव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 12:16 PM2022-02-03T12:16:22+5:302022-02-03T12:16:58+5:30

Looteri Dulhan : चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले. पोलिसांनी सांगितलं की, दोन वर्षात तरूणीने सहा लग्ने करत लोकांना लाखो रूपयांचा चूना लावला.

Bride looteri dulhan ran away with boyfriend with jewelry in Jabalpur Madhya Pradesh | दोन वर्षात सहा लग्ने, सर्वांसमोर बाइकवरून प्रियकरासोबत पळून गेली नवरी; बघतच राहिला नवरदेव

दोन वर्षात सहा लग्ने, सर्वांसमोर बाइकवरून प्रियकरासोबत पळून गेली नवरी; बघतच राहिला नवरदेव

Next

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) जबलपूरमधून (Jabalpur) एका लुटेरी दुल्हनची (Looteri Dulhan) घटना समोर आली आहे. स्वत:ला अनाथ सांगणाऱ्या एका तरूणीने कोर्ट परिसरातील एका मंदिरात लग्न केलं. मग नवरदेवाला चकमा देत दागिने आणि रोख रक्कम घेऊन प्रियकरासोबत बाइकवर बसून गायब झाली. काही वेळाने वकिलांनी तरूणीसोबत आलेल्या तिच्या मावशीला पकडून पोलिसांकडे सोपवलं. चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले. पोलिसांनी सांगितलं की, दोन वर्षात तरूणीने सहा लग्ने करत लोकांना लाखो रूपयांचा चूना लावला.

छिंदवाडामध्ये राहणारा दशरथ पटेल मोठ्या अपेक्षा घेऊन लग्न करण्यासाठी दोन दिवसांआधी जबलपूरला आला होता. त्याने नवरीसोबत मंदिरात सात फेरे घेतले. यानंतर कोर्टात लग्न रजिस्टर करण्यासाठी जात होता. पण त्याचवेळी त्याच्या बाइकवर बसलेली नवरी खाली उतरून दुसऱ्या बाइकवरून प्रियकरासोबत फरार झाली. नवरी अचानक फरार झाल्याने नवरदेव आणि त्याचे नातेवाईक लगेच कोर्ट परिसरात आले. त्यांनी आणि काही वकिलांनी तिची मावशी अर्चना बर्मनला घेरलं. त्यानंतर पोलिसांच्या हवाली केलं.

५० हजार रूपये आणि दागिने घेऊन फरार

पीडित पक्षानुसार नवरदेवाचे काका-काकू जबलपूरमध्ये राहतात आणि किराणा दुकान चालवतात. त्यांच्या दुकानावर एक महिला नेहमीच येत होती. दशरथची काकी सुनीतानुसार, त्यांना त्या महिलेकडे आपल्या पुतण्याच्या लग्नासंबंधी विषय काढला होता. त्यानंतर महिलेने रांझी इथे राहणाऱ्या पुतणीबाबत सांगितलं. नवरदेच्या काकीने सांगितलं की, त्या महिलेने सांगितलं होतं की, रेणुला आई-वडील नाहीत. तिची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. यानंतर दोन्ही पक्षांनी १ फेब्रुवारीला लग्न करण्याचं ठरवलं.

पोलीस अधिकारी बघेल यांनी सांगितलं की, आरोपी रेणु उर्फ संगीता अहिरवार आणि तिच्या साथीदारांना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे आणि असा अंदाज दिसत आहे की, या लोकांनी याआधीही अनेकांची फसवणूक केली असेल. कथित मावशी अर्चनाला अटक केल्यावर रेणु पोलीस स्टेशनला आली होती. पण तिच्याकडे पैसे आणि दागिने नव्हते.
 

Web Title: Bride looteri dulhan ran away with boyfriend with jewelry in Jabalpur Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.