अजमेरच्या (Ajmer Crime News) विजयनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्याबाबत समजल्यावर लोक हैराण झाले. इथे राहणाऱ्या ताराचंद मेवाडाने आपल्या मुलाचं लग्न महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील एका तरूणीसोबत ठरवलं होतं. मुलाच्या वडिलाने मुलीचा फोटो पाहिल्यावर लग्नासाठी होकार दिला. हिंगोलीच्या गोरेगांव सेनगांवची राहणारी मुलगी आणि तिच्या परिवारातील ८ सदस्यांना २० एप्रिलला बोलवलं गेलं आणि २१ एप्रिलला लग्नाचं अॅग्रीमेंट करण्यात आलं. सोबतच लग्नाच्या बदल्यात नवरीकडील लोकांनी २ लाख रूपयांची मागणी केली आणि मुलीला मुलाच्या घरी लग्नासाठी पाठवून देण्यात आलं.
त्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली. नवरीला सोन्याचं ८ ग्रॅमचं मंगळसूत्र, एक सोन्याचं कानातल्याचा जोड, एक अंगठी, जोडवे आणि इतर ज्यांची किंमत ५० हजार होती. हे दागिने नवरीला देण्यात आले. २२ एप्रिलला नवरदेवाने नवरीला जवळपास १५ हजार रूपयांचा मोबाइल फोन गिफ्ट दिला. २२ एप्रिलला सगळे लोक जेवण करून झोपले. अशातर रात्री नवरी संधी मिळताच दागिने, पैसे आणि फोन घेऊन नवरदेवाला झोपेतच सोडून फरार झालाी. नवरदेवाची आई रात्री १२ वाजता उठली तर तिला दरवाजा उघडा दिसला. तेव्हा हा प्रकार समोर आला.
यानंतर नवरदेवाच्या वडिलांनी नवरीसहीत आठ लोकांविरोधात विजयनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकारी दिनेश कुमार चौधरी यांनी सांगितलं की, ताराचंद मेवाडा यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यात सांगण्यात आलं की, मी माझ्या नातेवाईकांच्या ओळखीने आपल्या मुलाचं लग्न ठरवलं होतं. त्यांनी मला एक मुलगी दाखवली होती. ते लग्नाच्या बहाण्याने माझ्याकडून दोन लाख रूपये घेऊन गेले. मुलगी इथे दोन-तीन दिवस थांबून रात्री घरातून फरार झाली. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.