Rajasthan News : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सरवाना पोलिसांनी एका लग्नाच्या फसवणुकीच्या केसमध्ये नवरीला अटक केली आहे. सीआय किशनाराम यांनी सांगितलं की, दांतिया येथील ३० वर्षीय सोहन सिंह राजपूतने पोलिसात तक्रार देत सांगितलं की, मुराद खां ने त्याचा मित्र गणपत सिंह चौहान डीसाचा मेहुणा कीर्ती सिंहच्या मुलीसोबत लग्न लावण्याचं बोलला होता. तो म्हणाला की, यासाठी ५ लाख रूपये द्यावे लागतील. ज्यानंतर पीडित आणि त्याच्या कुटुंबियांना २० वर्षीय मुलीचा फोटो दाखवण्यात आला. अशात पीडित फसला आणि आपल्या कुटुंबियांसोबत बोलून लग्न फिक्स केलं.
त्यानंतर २६ मे रोजी मुराद खानने पीडित तरूणाला सांगितलं की, गणपत सिंहच्या घरी कुणाचंतरी निधन झालं आहे. अशात चार-पाच लोक चला आणि मुलीसोबत लग्न लावून देऊ. त्यानंतर पीडितसहीत काही लोक डीसा येथील गणपत सिंहच्या घरी गेले. इथे पैसे आणि दागिने घेऊन मुलीसोबत लग्न लावण्यात आलं. त्यानंतर नवरदेव नवरीला घेऊन गेला.
रविवारी सकाळी आजूबाजूच्या महिला नवरीसोबत फोटो काढण्यासाठी आल्या तेव्हा समोर आलं की, ज्या मुलीचा फोटो दाखवण्यात आला होता आणि ज्या मुलीसोबत लग्न लावून देण्यात आलं त्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. चौकशी दरम्यान नवरीने सगळा खुलासा केला.
पोलिसांनी हसन नगरला राहणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'ला हिना खानला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. यावेळी तिने खुलासा केला की, तिने केवळ ३० हजार रूपये घेऊन लोकांच्या सांगण्यावरून लग्न केलं. पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर नवरीला पोलिसांनी अटक करून कोर्टासमोर हजर केलं. कोर्टाने नवरीला तुरूंगात पाठवलं.