दारूची बाटली फोडून स्वतःचा गळा घेतला कापून; 'या' कारणामुळे उचलले असे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 09:36 PM2021-12-28T21:36:28+5:302021-12-28T21:37:53+5:30

Broke a bottle of liquor and cut his own throat : राजगड जिल्ह्यातील बिओरा येथे एका व्यक्तीने दारूच्या नशेत मृत्यूला कवटाळले. दारूच्या नशेत त्याने दारूची बाटली फोडली आणि स्वतःचा गळा चिरला.

Broke a bottle of liquor and cut his own throat; Steps taken for 'this' reason | दारूची बाटली फोडून स्वतःचा गळा घेतला कापून; 'या' कारणामुळे उचलले असे पाऊल

दारूची बाटली फोडून स्वतःचा गळा घेतला कापून; 'या' कारणामुळे उचलले असे पाऊल

Next

राजगड - मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात एका ५५ वर्षीय व्यक्तीने दारूची बाटली फोडून स्वतःचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरच्यांना काही कळेपर्यंत मानेतून खूप रक्त वाहत होतं. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
 
दारूची बाटली फोडून स्वतःचाच गळा चिरला
राजगड जिल्ह्यातील बिओरा येथे एका व्यक्तीने दारूच्या नशेत मृत्यूला कवटाळले. दारूच्या नशेत त्याने दारूची बाटली फोडली आणि स्वतःचा गळा चिरला.

त्याच्या घशातून रक्त वाहत होते
संशयास्पद अवस्थेत गळा चिरलेल्या या तरुणाला सोमवारी रात्री उशिरा बिओरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले, तोपर्यंत त्याच्या घशातून खूप रक्त वाहत होते. रुग्णालयात नेत असताना तरुणाचा मृत्यू झाला.

दारू प्याल्यानंतर त्याचा घरातील लोकांशी वाद होत असे
खरं तर, राजगड जिल्ह्यातील बिओरा सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील मोगिया परिसरात राहणारे ५५ वर्षीय केसरी पुरी गोस्वामी याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन त्याचे रोज घरातील लोकांशी भांडण होत असे.

काचेने गळा कापला
सोमवारी रात्री उशिराही त्याने गोंधळ घातला. त्याने घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन दारूची बाटली फोडली आणि स्वतःचा गळा चिरला. काच फुटल्याने त्याचा गळा चिरला गेला असून बाटली फुटल्याचा आवाज ऐकून कुटुंबीय पोहचेपर्यंत रक्तस्त्राव खूप झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात तरुण पडला होते. रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Broke a bottle of liquor and cut his own throat; Steps taken for 'this' reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.