शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

आरटीओतील बदलीसाठी दलाल सक्रिय; पॉश हॉटेलमध्ये पुणेवाला डेरेदाखल

By नरेश डोंगरे | Published: March 08, 2023 8:20 PM

गेले वर्षभरापासून राज्यातील प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) वादग्रस्त विषयांमुळे चर्चेत आहे. 

नागपूर : शहरातील एका पॉश हॉटेलमध्ये थांबलेला एक व्यक्ती दलालांच्या माध्यमातुन आरटीओतील बढती बदलीसाठी अनेकांशी संपर्क साधत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मोठ्या रकमेची डील असल्याने ही चर्चा करणाऱ्यांनी शहानिशा चालविल्यामुळे संबंधित वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. गेले वर्षभरापासून राज्यातील प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) वादग्रस्त विषयांमुळे चर्चेत आहे. 

महाराष्ट्रात सत्तांतरापूर्वी आणि आता सत्तांतरानंतरही बदलीच्या  संबंधाने सुरू असलेली चर्चा थांबायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर, बढती बदलीसाठी फिल्डिंग लावून असणारे आरटीओतील  रॅकेट राज्यभरातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी आपल्या दलालाच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांच्याकडून वसुली करतात. कोट्यावधी रुपयांची यातून उलाढाल होते. त्यानंतर ठराविक ठिकाणी बढती बदलीची यादी तयार होते. प्रचंड मोठी रक्कम हाती पडत असल्यामुळे बढती बदलीच्या रॅकेटची सूत्रे आपल्या हाती यावी म्हणून आरटीओतील अनेक 'रिटायर्ड' दरवर्षी फिल्डिंग लावतात. गेल्या वर्षभरापासून पुण्यातील एका व्यक्तीने अशाच प्रकारे प्रयत्न चालविले आहे. मात्र कुणी ना कुणी त्यात 'खाडे' टाकत असल्याने या व्यक्तीच्या नावावर नेहमी खाडाखोड होते. 

गेल्या वर्षी महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून हा निवृत्त अधिकारी पुन्हा जोमाने सक्रिय झाला. त्याने राज्यातील आरटीओत होणाऱ्या सर्व बदल्याचे कंत्राट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहे. त्यात त्याला यश आले की नाही, हे कळायला मार्ग नाही. मात्र तो आता नागपुरात आला असून एका पॉश हॉटेलमध्ये थांबून त्याने आपल्या दोन दलालाच्या माध्यमातून नागपूर विदर्भातील अधिकारी कर्मचाऱ्यांना बढती बदली साठी ऑफर दिल्याची चर्चा आहे. या दोन दलालात एक महिला आहे, हे विशेष! संबंधित सूत्रानुसार, या दलालाने बदलीसाठी इच्छुक असणाऱ्यांना शंभर टक्के पाहिजे त्या ठिकाणी बदली करून देण्याची गॅरंटी दिल्याचे समजते.

.... म्हणून चर्चा बाहेर सध्या सर्वत्र वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे नाव सांगून बढती, बदली नियुक्तीसाठी पैसे मागून फसवणूक केली जात असल्याने आणि तशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित होत असल्यामुळे काहींनी शहानिशा चालविली. त्यातूनच बदली बढतीच्या ऑफरची चर्चा परिवहन खात्यातून बाहेर आली आहे.

यासंबंधी माहिती नाही : विजय चव्हाण या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याकडे या संबंधाने कसलीही माहिती नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर