शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

भावाकडून तीन बहिणींना मारहाण; वाचवितानाच्या प्रयत्नात बहीणींकडून भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 8:49 PM

११ नोव्हेंबरला रात्री शैलेश हा दारूच्या नशेत घरी येऊन वडिलांच्या फोटोपुढे नॉनव्हेज जेवणाचा नैवैद्य ठेवण्याचा हट्ट करू लागला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क,

नवी मुंबई : दारूच्या नशेत बहिणींना मारहाण करणाऱ्या तरुणाचा बहिणीच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात एका बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या निधनाच्या दहा दिवसातच कुटुंबात हा प्रकार घडला आहे. 

काही दिवसांपूर्वी ऐरोली येथे राहणाऱ्या शैलेश सोरटे (३४) याच्या मृत्यूची घटना घडली होती. त्याला दारूचे व्यसन असल्याने दारूच्या नशेत पडून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. परंतु बहिणीच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार एका बहिणीवर सोमवारी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश हा व्यसनी असून तो दारूच्या नशेत घरी येऊन तीन बहिणींना मारहाण करत असे. २ नोव्हेंबरला त्यांचे वडील रामचंद्र यांचे निधन झाले आहे. ११ नोव्हेंबरला रात्री शैलेश हा दारूच्या नशेत घरी येऊन वडिलांच्या फोटोपुढे नॉनव्हेज जेवणाचा नैवैद्य ठेवण्याचा हट्ट करू लागला होता. यामुळे घरात भांडण झाले असता मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या ७० वर्षीय आईला शैलेशने कानाखाली मारली होती.

यामुळे तिन्ही बहिणींनी मिळून शैलेशला घराबाहेर काढले होते. परंतु नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर पहाटे ३ च्या सुमारास त्याला परत घरात घेतले होते. यावेळी घरात आल्यानंतर त्याने पुन्हा तिन्ही बहिणींना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यामध्ये ज्योती (३२) हिचा गळा तो आवळत असताना तिने स्वतःच्या बचावासाठी लोखंडी चिमट्याने त्याच्यावर हल्ला केला होता. यानंतर तो इतर दोन बहिणींचा गळा आवळत असताना पुन्हा तिने बहिणींच्या सुटकेसाठी शैलेशचा डोक्यात चिमटा मारला.

यामध्ये जखमी झाल्यानंतर तो शांत झाला असता तो झोपला आहे असे समजून तिन्ही बहिणी देखील झोपल्या होत्या. मात्र सकाळी तो अस्वस्थ असल्याचे समजताच बहिणींनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. यावेळी घाबरलेल्या बहिणींनी तो दारूच्या नशेत पडून जखमी झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. परंतु पोलिसांच्या चौकशीत भावा बहिणींच्या भांडणात त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने ज्योती सोरटे हिच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी