Bihar Crime News : समाजात दीर-वहिनी आणि भावोजी-मेहुणीचं नातं फारच महत्वाचं मानलं जातं. ही नाती वेगळी असतात कारण यात ते एकमेकांची गंमत करू शकतात. पण अनेकदा असं होतं की, काही लोक या नात्यातील गंमतीची सीमा पार करतात आणि चूक करून बसतात. ज्यामुळे अनेकदा हे नातं तुटतंही. अशीच एक घटना मधुबनीमधून समोर आली आहे.
मधुबनीमध्ये राहणारा एक तरूण मेहुणीला तिचं लग्न झाल्यावरही आपल्या मनातून आणि डोक्यातून काढू शकला नाही. तो दररोज तिला मेसेज पाठवत होता. हे मेसेज मेहुणी डिलीट करत होती. पण गेल्या तीन जूनला ती भावोजीने पाठवलेले मेसेज डिलीट करणं विसरली. दरम्यान तिच्या पतीने मोबाइलवरील हे मेसेजेस वाचले. मेसेज असे होते की, ते वाचून तिचा पती संतापला.
त्यानंतर संतापलेला पती पत्नीच्या भावोजीकडे गेला. इतकंच नाही तर तो त्याच्यासोबत दोन डझन लोकंही सोबत घेऊन गेला होता. पत्नीच्या भावोजीला भेटून त्याला चांगलीच समज दिली. ज्यानंतर तो गायबच झाला. मेसेज पाठवणाऱ्या तरूणाच्या पत्नीने याची तक्रार पोलिसात केली आणि न्यायाची मागणी केली.
मधुबनीच्या एका गावात राहणाऱ्या विवाहित महिलेने तक्रारीत सांगितलं की, ती तिच्या पतीसोबत गुड्डी मोहल्ल्यात राहते. तिथे त्यांचं औषधाचं दुकान आहे. तिने पुढे सांगितलं की, तिच्या पतीने तिच्या लहान बहिणीला तिच्या लग्नानंतरही मेसेज आणि फोटो पाठवण्याचा सिलसिला सुरूच ठेवला. ज्यामुळे बहिणीला खूप त्रास होत होता. महिलेने पतीला अनेकदा असं न करण्यासही सांगितलं. पण त्याने काही तिचं ऐकलं नाही. आता याची माहिती लहान बहिणीच्या पतीला मिळाली.
गेल्या 3 जूनला सायंकाळी काही लोकांना घेऊन पत्नीच्या भावोजीला भेटायला गेल्यापासून महिलेचा पती गायबच झाला. तिला संशय आहे की, तिच्या पतीसोबत काही दुर्घटना झाली असावी. पोलिसांनी तक्रारीनंतर चौकशी सुरू केली आहे.