पटना – आज ज्या घटनेबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत ती कुठल्याही कमर्शियल सिनेमाची कहाणी नव्हे तर ते वास्तव आहे बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील विक्रमगंज येथे घडलेल्या घटनेबाबत. या घटनेला पूर्णपणे फिल्मी स्टाईलनं घडवण्यात आली आहे. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. ही कहानी आहे एका बहिणीची, तिच्या प्रियकराची आणि त्या दोघांमध्ये शत्रू बनलेल्या भावाची.
बहिणीली तिच्या प्रियकारापासून भेटण्यापासून भावाने रोखलं. त्यानंतर संतापलेल्या भावाने बहिणीच्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी लाखो रुपयांची सुपारी दिली. एका प्रेम प्रकरणापासून या घटनेची सुरुवात होते. त्यानंतर रचण्यात येते हत्येचे षडयंत्र. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी प्रिंसच्या बहिणीचं हिमांशु नावाच्या एका मुलासोबत प्रेम प्रकरण सुरु होते. त्यामुळे प्रिंस खूप नाराज होता. त्याने बहिणीसमोर हिमांशुबद्दलच्या नात्यावर आक्षेप घेतला. मात्र बहिणीनं भावाचं ऐकलं नाही.
त्यानंतर रागावलेल्या प्रिंसनं हिमांशुचा काटा काढण्याचा प्लॅन रचला. नीतीश आणि रॉकी नावाच्या गुंडांना प्रिंसने ४ लाखांची सुपारी दिली. नीतीश आणि रॉकी प्रिंसच्या बहिणीचा प्रियकर हिमांशुचा शोध घेऊ लागले. ६ जानेवारी ते दोघं हिमांशुच्या घरी पोहचले. तेव्हा घरात हिमांशुचा मित्र राहुलही उपस्थित होता. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नीतीश आणि रॉकीनं हिमांशुवर गोळ्या झाडल्या. परंतु हिमांशुला वाचवण्यासाठी राहुल धावला. राहुलच्या डोक्याला गोळी लागली. त्यामुळे घटनास्थळीच राहुलचा मृत्यू झाला. त्यानंतर गुडांनी हिमांशुवर चाकूने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर दोन्ही गुन्हेगारांनी घटनास्थळावर बाईक सोडून पळून गेले. स्थानिक लोकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाईक ताब्यात घेतली. आणि हिमांशुला हॉस्पिटलला नेले.
पोलिसांनी प्रिंसला केली अटक
या घटनेचा शोध घेताना पोलिसांना प्रिंसबद्दल माहिती पडलं. त्यांनी प्रिंसला अटक करत चौकशी केली असता त्यानेच हिमांशुच्या हत्येची सुपारी दिल्याचं कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी नीतीश आणि रॉकीला मोहनिया येथून अटक केली.
मोबाईलनं उलगडलं हत्येचं रहस्य
प्रिंसने हिमांशुचा काटा काढण्यासाठी नीतीश आणि रॉकीला ४ लाखांची सुपारी दिली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांनी त्यांचे मोबाईल सर्विलांसवर ठेवले. त्यानंतर कॉल डिटेल्स काढले. ज्यात प्रिंससोबत त्यांचे दोनदा बोलणे झाले होते. या संवादाबाबत अधिक चौकशी केली असता ४ लाखांच्या हत्येचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी याचा खुलासा केला. सध्या या प्रकरणात आरोपी नीतीश, रॉकीसह प्रिंसलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.