शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
4
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
5
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
9
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
10
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
11
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
12
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
13
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
14
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
15
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
16
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
17
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
18
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
19
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
20
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!

दादा, मला वाचव, 'तो' बंदूक घेऊन मागे फिरतोय अन् काही वेळातच आढळला वंशिकाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 3:08 PM

Firing on Student : वंशिकाचा मृतदेह पडल्याने लोकांची गर्दी झाली होती. वंशिकासोबत फक्त सिनिअर विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

डेहराडूनमध्ये गुरुवारी भरदिवसा एका विद्यार्थिनीची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनीअटक केली आहे. आरोपी डेहराडूनमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र पोलिसांनी नाकाबंदी केल्यामुळे तो पळून जाऊ शकला नाही आणि पकडला गेला. विद्यार्थ्याने आपल्याच वर्गातील विद्यार्थिनीला का मारले याचे कारण अतिशय आश्‍चर्यकारक आहे. वंशिका कॉलेजमधील काही सिनिअर विद्यार्थ्याला भाऊ मानत असे. रुग्णालयात उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, त्याला 4:41 वाजता फोन आला की दादा, मला वाचव, आदित्य मला मारेल, तो बंदूक घेऊन फिरत आहे. काही वेळाने ते घटनास्थळी पोहोचले असता तेथे वंशिकाचा मृतदेह पडल्याने लोकांची गर्दी झाली होती. वंशिकासोबत फक्त सिनिअर विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. वंशिकाचे सिनिअर विद्यार्थी तिचा मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचले. त्याने सांगितले की, वंशिका त्याला भाऊ मानत होती आणि अनेकदा त्याच्या मित्रांशी आणि त्याच्याला आदित्य तिला त्रास देत होता याबद्दल सांगत असे. तो तिला प्रेम करण्यासाठी बळजबरी करत होता पण, वंशिकाच्या मनात त्याच्याविषयी काहीच प्रेम नव्हतं. अशा परिस्थितीत तो तिला पुन्हा पुन्हा त्रास देत होता.आदित्य वंशिकावर बोलण्यासाठी दबाव टाकत होता

गुरुवारी वंशिका कॉलेजच्या बाहेर गेली तेव्हा आदित्य तिथेच उभा होता. त्याची दुचाकीही तेथेच उभी होती. आदित्यने तिला त्याच्याकडे बोलावले. पण, ती गेली नाही. दरम्यान, वंशिकाने तिच्या भावाला म्हणजेच सिनिअर विद्यार्थ्याला फोन करून सांगितले की, दादा मला वाचव, आदित्यच्या हातात बंदूक आहे, तो तिला मारून टाकेल.

ओपन चॅलेंज दिले लेडी डॉनने एसपीला, बिनधास्त फिरत होती; २४ तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्याप्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार विद्यार्थिनीला आदित्यशी बोलायचे नव्हते. वंशिका तिथून निघू लागल्यावर विद्यार्थ्याने तिच्यावर गोळी झाडली. दरम्यान मानलेला भाऊ घटनास्थळी पोहोचला तेव्हा वंशिका जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. सिनिअर विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एसपी सिटी सरिता डोवाल, सीओ अनिल कुमार जोशी आणि पोलिस स्टेशन रायपूर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोरोनेशन हॉस्पिटलमध्ये ठेवला आहे. विद्यार्थिनीचे कुटुंबीयही रुग्णालयात पोहोचले. गोळी झाडणारा विद्यार्थी हा मूळचा शामली येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. तो रायपूर भागात आईसोबत राहतो. विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात असल्याचे एसओ अमरजीत रावत यांनी सांगितले. 

विद्यार्थिनी कॉलेजच्या वसतिगृहात राहत होती

रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादा नगर येथील एका खाजगी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीची तिच्या ओळखीच्या आदित्य तोमर नावाच्या तरुणाने गोळ्या झाडून हत्या केली. सहस्त्रधारा रोडवरील दांडा खुडवनाला येथील सिद्धार्थ कॉलेजमध्ये ही घटना घडली. मृत विद्यार्थिनी ही त्याच महाविद्यालयात डी-फार्माच्या प्रथम वर्षात शिकत होती. गोळी झाडल्यानंतर मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिचा मृत्यू झाला.

सोशल मीडियाच्या कमेंटवरून वाद निर्माण झाला होताचौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली, मात्र त्याने सांगितलेल्या हत्येचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की, मृत वंशिका हिने महिनाभरापूर्वी सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला होता, ज्यावर आरोपीने कमेंट केली होती. यानंतर दोघांमध्ये कमेंटवरून वाद झाला.एवढेच नाही तर मुलीने तिच्या वर्गातील मित्रांकडे याबाबत तक्रार केली, त्यानंतर मैत्रिणींनी आरोपी मुलाच्या कुटुंबीयांना माहिती दिली. दुसर्‍या दिवशी कॉलेजमध्ये पुन्हा एकदा दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यात मुलीच्या काही मित्रांनी त्याला धमकावले आणि त्यावर त्याने मुलीच्या पायाला हात लावून माफी मागितली. मग काय, या प्रकाराने मुलगा संतापला आणि त्याने सोबत ठेवलेल्या बंदुकीने तरुणीवर गोळी झाडून हत्या केली.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसArrestअटकStudentविद्यार्थीDeathमृत्यू