शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

डी गँगसाठी काम करणाऱ्या भावांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 6:41 AM

छोटा शकीलसोबत पैशांचा व्यवहार उघडकीस येताच एनआयएची कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या विरोधातील ऑपरेशन डी गँग अंतर्गत सलग चार दिवसांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतील दोन भावांना बेड्या ठोकल्या आहेत. दोघांचेही दाऊदचा हस्तक छोटा शकीलसोबत केलेले व्यवहार समोर येताच ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी दोघांनाही २० मेपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरिफ अबू बकर शेख (५९) आणि शकील अबू बकर शेख उर्फ शब्बीर (५१) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही मुंबईतील ओशिवरा परिसरात वास्तव्यास आहेत. एनआयएच्या पथकांनी सोमवारी डी कंपनीचे शार्पशूटर, ड्रग्ज तस्कर, हवाला ऑपरेटर, बांधकाम क्षेत्रातील हस्तक आणि गुन्हेगारी सिंडिकेटमधील अन्य प्रमुखांच्या मुंबईतील २४ आणि ठाण्यातील पाच अशा एकूण २९ ठिकाणी छापेमारी केली.

एनआयएने या छापेमारीमध्ये ताब्यात घेतलेली कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजांच्या आधारे एनआयए दाऊद टोळीच्या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा, अमली पदार्थांची तस्करी आणि बनावट चलनाच्या पुरवठ्यासह आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहे. यासाठी एनआयएने छोटा शकील याचा साडू सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि बांधकाम व्यावसायिक सोहेल खंडवानी यांच्यासह अजय गोसालिया, गुड्डू पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, समीर हिंगोरिया, कय्युम शेख, आरिफ शेख आणि शब्बीर शेख अशा १८ जणांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. तपासात आरिफ  आणि शब्बीर यांचे छोटा शकील याच्याशी झालेले आर्थिक व्यवहार समोर येताच, एनआयएने गुरुवारी रात्री उशिराने या दोघांना अटक केली. डी कंपनीच्या मुंबईच्या पश्चिम उपनगरांत बेकायदेशीर कारवाया हाताळण्यात दोघांचाही सहभाग हाेता. 

छोटा शकीलचाही शोध सुरूदुसरीकडे छोटा शकीलचाही शोध सुरू आहे. इंटरपोलने त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावत अधिक तपास सुरू ठेवला आहे. छोटा शकील ‘डी गँग’चे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट सांभाळत असून, त्याचा खंडणी, तस्करीसह दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचेही एनआयएने नमूद केले आहे.  

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा