शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कुख्यात बिल्डर मुकेश झाम याला पत्नीसह अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 12:55 AM

मोठी रोकडही सापडली; नागपूर पोलिसांची पुण्यात कारवाई  

नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा कुख्यात बिल्डर मुकेश झाम आणि त्याची पत्नी पूनम झाम या दोघांच्या नागपूर पोलिसांनी पुण्यात जाऊन मुसक्या बांधल्या. त्यांना घेऊन पोलीस पथक नागपूरकडे निघाले असून शुक्रवारी दुपारपर्यंत ते नागपुरात पोहचणार आहे. आरोपी मुकेश झाम आणि त्याच्या पत्नीवर फसवणुकीचे दोन गुन्हे आहेत. त्यातील एक नवोदय बँकेच्या घोटाळ्याचा तर दुसरा गृह प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो जणांचे कोट्यवधी रुपये हडपण्याचा आहे. आरोपी हेमंत झामचा मुकेश झाम काका आहे. हेमंत, मुकेश, त्याचे काही नातेवाईक आणि साथीदार यांनी कन्हैय्या सिटीच्या नावाखाली बंगले, फ्लॅट स्वस्त दरात देण्याची थाप मारून शेकडो लोकांना गंडवले. अनेकांची आयुष्यभराची रक्कम गिळंकृत करून त्यांना पैशासाठी मोताद करणाऱ्या आरोपींनी नागपुरातून पळ काढल्यानंतर पीडितांच्या पैशावर ऐशोरामात जगणे सुरू केले. पोलीस त्यांचा जागोजागी शोध घेत होते. मात्र आरोपी न्यायालयाच्या वॉरंटलाही दाद देत नव्हते. पोलिसांच्या लेखी फरार असलेला हेमंत झाम दोन कोटींच्या आलिशान सदनिकेत सोनेगावात ऐशोरामात राहत होता. अनेकांची आर्थिक कोंडी करून त्यांना रस्त्यावर आणणारे आरोपी झाम आणि त्याचे साथीदार पोलिसांना कसे काय सापडत नाही, असा सवाल करून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्यांना तातडीने शोधून काढण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पथकाने हेमंत झाम याला दोन आठवड्यांपूर्वी नाट्यमयरित्या अटक केली होती. त्यानंतर त्याचा साथीदार यौवन गंभीरही पोलिसांच्या हाती लागला. सध्या हे दोघे न्यायालयीन कस्टडीत आहेत. दरम्यान, या दोघांच्या चौकशीतून हेमंत झामचा काका आरोपी मुकेश झाम पुण्यात हिंजेवाडी भागात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाच्या  पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी त्यांचे पथक पुण्यात पाठवले. तेथे पोलिसांनी बरीच शोधाशोध केल्यानंतर बुधवारी सकाळी मुकेश झाम पोलिसांच्या हाती लागला. तो आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सदनिकेची तपासणी केली असता कोट्यवधींची रोकडही पोलिसांना मिळाल्याचे समजते. मात्र, रोकड सापडल्याच्या माहितीला दुजोरा मिळू शकला नाही. आरोपी झाम दाम्पत्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथकाने तेथील न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर सायंकाळी तेथून पोलीस पथक झाम दाम्पत्याला घेऊन नागपूरकडे निघाले. शुक्रवारी दुपारपर्यंत ते नागपुरात पोहोचतील, असे सूत्रांनी सांगितले.शुक्रवारपासून पोलिसांची शोधाशोध येथील गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाचे (ईओडब्ल्यू) पथक गेल्या शुक्रवारपासून पुण्यात झामला शोधत होते. अखेर गुरुवारी सकाळी हिंजेवाडी परिसरात तो पोलिसांच्या हाती लागला. झाम याने नागपुरात गिळंकृत केलेली रक्कम पुण्यात कोट्यवधीची मालमत्ता जमविण्यासाठी गुंतविल्याचे समजते. 

टॅग्स :Arrestअटक