मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात एका हिंदू मुलीचे मुस्लिम पुरुषासोबत लग्न केल्याच्या विरोधात कुटुंबीयांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र उच्च न्यायालयाने या अपहरण प्रकरणात त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. मात्र, जिल्हा प्रशासनाने १५ दिवसांपूर्वी त्या मुस्लिम तरुणाची तीन दुकाने आणि घर पाडले होते.नेमके काय प्रकरण?22 वर्षीय साक्षी साहूने नंदिता दुबे यांच्या अध्यक्षतेखालील मध्य प्रदेशउच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेत नमूद केले की याचिकाकर्ता प्रौढ नागरिक आहे, जिने आसिफ खानशी स्वेच्छेने लग्न केले आहे.साक्षी साहूचा भाऊ मोहित साहू याच्या तक्रारीवरून दिंडोरी पोलिसांनी 4 एप्रिल रोजी आसिफ खानविरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. साक्षी ४ एप्रिल रोजी आसिफसोबत पळून गेली होती.
हिंदू मुलीशी लग्न केल्याने मुस्लिम मुलाच्या घरावर फिरवला बुलडोझर, हायकोर्टाने दिले 'हे' आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 4:15 PM