शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Bulli Bai App Case: १८ वर्षीय युवतीनं रचलं १०० मुस्लीम महिलांविरोधात षडयंत्र; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 8:46 AM

उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमधून १८ वर्षीय आरोपी मुलीला ताब्यात घेतले आहे. ती १२ वीच्या वर्गात शिकते.

मुंबई – सोशल मीडियावर सक्रीय १०० मुस्लीम महिलांविरोधात षडयंत्र रचणाऱ्या आरोपी मुलीला ताब्यात घेतलं आहे. ही मुलगी उत्तराखंडची राहणारी आहे. क्राईम ब्रांच तिला ताब्यात घेऊन मुंबईला आणत आहे. आरोपी युवतीसोबत तिचा सहकारी विशाल कुमार हादेखील या षडयंत्रात सहभागी होता. आरोपी युवतीचं वय अवघं १८ वर्ष आहे तर विशाल कुमारचं वय २१ वर्ष आहे.

आरोपी मुलगी आणि तिच्या मित्राने बुल्ली बाई अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लीम महिलांविरोधात अपमानास्पद आणि अश्लिल गोष्टी पसरवल्या होत्या. मुस्लीम महिलांची बोली लावण्याचं कृत्य केले गेले. पोलीस या युवतीच्या सहकारी मित्रालाही बंगळुरुहून मुंबईला आणत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमधून १८ वर्षीय आरोपी मुलीला ताब्यात घेतले आहे. ती १२ वीच्या वर्गात शिकते. मुंबई क्राईम ब्रांचने तिला अटक करत स्थानिक न्यायालयात हजर केले. त्याठिकाणी आरोपी युवतीला ट्रांजिट रिमांडमध्ये ठेवत टीम मुंबईसाठी रवाना झाली. बुधवारी टीम मुंबईला पोहचेल.

या षडयंत्रात सहभागी असलेला आरोपी विशाल कुमारला बंगळुरूहून अटक केली. तो २१ वर्षीय इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. विशाल हा मुख्य आरोपी युवतीचा सहकारी मित्र आहे. उत्तराखंडमध्ये राहणारी युवती आणि विशाल दोघंही एकमेकांना पहिल्यापासून ओळखत होते. दोघंही फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मित्र आहेत. त्यामुळे पोलीस तपासात दोघांची लिंक शोधण्यात पोलिसांना लगेच यश आलं. या प्रकरणात अटक आरोपी विशाल कुमारला मुंबई पोलिसांनी बंगळुरूत कोर्टात हजर केले. त्याठिकाणी १० जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलिसांना बुल्ली बाई अ‍ॅपच्या ठिकाणांचा शोध घेण्याची परवानगी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन Appवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीतील एका महिलेने अशाप्रकारे प्रसिद्ध केलेले फोटो ट्विटरवर शेअर केले. त्यानंतर, हा प्रकार समोर आला. या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार केली. हाच मुद्दा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उचलून धरत मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीदेखील केली होती.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस