GitHub वर बुल्ली बाईॲपचा मुख्य सूत्रधार आणि निर्माता दिल्लीपोलिसांच्या हाती लागला आहे. बुल्ली बाईॲपच्या मुख्य twitter खातेदाराला दिल्लीपोलिसांच्या विशेष पथकातील IFSOने (इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स युनिट) आसाममधून अटक केली आहे. आज दुपारी 3:30 वाजता दिल्ली विमानतळावर या आरोपीला घेऊन टीम पोहोचेल.
इनपुट मिळाल्यानंतर दिल्ली पोलिस आसाममध्ये पोहोचले होते, तेथून बुल्ली बाईच्या निर्मात्याला अटक करण्यात आली आहे. नीरज बिश्नोई असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वय २१ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. यामध्ये श्वेता सिंग, विशाल कुमार आणि मयंक रावत यांना अटक करण्यात आली. श्वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक करण्यात आली. ती एकूण २१ वर्षांची आहे.
मुस्लिम महिला बदनामी प्रकरणी इंटरनेटवर बुली बाई ॲपवरून सोशल मीडियावरील महिलांचे फोटो अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह पोस्ट नमूद करण्यात आल्या होत्या. ३१ डिसेंबरला ॲप डेव्हलप करण्यात आलं. त्यानंतर बुली बाई ॲपचे ट्विटर हँडल तयार करण्यात आले होते. बंगळुरुचा विशाल कुमार झा इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. उत्तराखंडमधून श्वेता सिं