शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

बंटी-बबलीने सोनारांना घातला लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:01 AM

दोघांना फसवले : व्यापारी असल्याची बतावणी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : बंटी-बबलीच्या एका जोडीने दोघा सोनारांना दोन लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.दीनदयाळ रोड परिसरात राहणाऱ्या भूपेश जैन (३७) यांचे पूर्वेतील आयरे रोड परिसरात रुचिता ज्वेलर्स नावाचे सोनेचांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. २६ जून रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास जैन दुकानामध्ये बसले होते, तेव्हा एक दाम्पत्य त्यांच्या दुकानात आले. त्याच्यातील पुरुषाने त्याचे नाव प्रेम ढिल्लोड असे सांगत, त्याचा भिवंडी येथे कपड्याचा कारखाना असल्याचे जैन यांना सांगितले. सोबत असलेल्या त्याच्या पत्नीचे नाव प्रमिला असल्याचे सांगितले. ढिल्लोड दाम्पत्याला सोन्याचे दागिने विकत घ्यायचे असल्याने, जैन यांनी दुकानातील विविध सोन्याचे दागिने दाखवायला सुरुवात केली. त्या दोघांनी जैन यांच्या दुकानातून मंगळसूत्र, दोन अंगठ्या, कानांतील रिंग, एक नथनी आणि एक पेण्डल असे सुमारे एक लाख ७० हजार रुपयांचे दागिने खरेदी केली. त्यानंतर, ढिल्लोड दाम्पत्याने त्यांच्याकडे रोख रक्कम नसल्याचे सांगत जैन यांना त्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे रक्कम जमा करतो, असे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार जैन यांनी ढिल्लोड याला सर्व माहिती दिली. थोड्या कालावधीनंतर ढिल्लोड दाम्पत्य पुन्हा दुकानात आले आणि त्यांनी सदरची रक्कम आरटीजीएसद्वारे पाठवल्याचे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जैन यांनी ढिल्लोड दाम्पत्याला दागिने दिले. परंतु, पैसे जमा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले.मे महिन्यातही लुबाडलेभीमसिंग कडेचा यांनाही अशाच स्वरूपाने फसवत त्यांच्या कावेरी ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानातून ढिल्लोड दाम्पत्याने ८ मे रोजी सुमारे ५४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.